◾ मुंबई येथे काँग्रेसच्या बैठकीत चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चिपळुनातील पक्ष संघटनात्मक वाढीचा दिला आढावा
◾ ना. सतेज उर्फ बंटी पाटील लवकरच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी: ओंकार रेळेकर
चिपळूण,दि-०४:- मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत वरिष्ठांनी रत्नागिरी जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेताना चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चिपळूणातील पक्ष संघटनात्मक वाढीसंदर्भात माहिती दिली. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कमिटीला निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी केली यानंतर वरिष्ठांनी तत्त्वतः मान्यता दिली ही बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ना. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, कोकण प्रभारी बी. एम. संदीप, माजी आमदार हुस्नबानू खलीपे आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई येथे काँग्रेसच्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक आढावा घेण्यात आला. तर यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपले म्हणणे मांडताना चिपळूणातील काँग्रेस पक्ष संघटनात्मक संदर्भातील माहिती दिली. तसेच आणखी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काही मुद्दे सुचवले. रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासकीय निवडीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी मागणी केली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक कमिटीला योग्य ते निर्णय घेण्याची मुभा मिळावी अशी मागणी केली. यावर ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा लवकरच दौरा करून काँग्रेस कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. तसेच या दौऱ्यामध्ये पक्ष संघटनात्मक वाढीचा आणखी आढावा घेऊन मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले. यामुळे लवकरच ना. सतेज पाटील यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी प्रदेश सरचिटणीस इब्राहीम दलवाई, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह ,युवक काँग्रेस शहराध्यक्ष फैसल पिलपिले, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य गुलजार कुरवले, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर , माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू थरवळ, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये, नगसेविका सफा गोठे, युवक तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले , शहर उपाध्यक्ष राकेश दाते, दीपक निवाते आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

