कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑येणारा काळ ‘अविवाहितांचा युग’ठरणार आहे का…?समाजासमोर उभा ठाकलेला नवा प्रश्न.

*🛑येणारा काळ ‘अविवाहितांचा युग’ठरणार आहे का…?समाजासमोर उभा ठाकलेला नवा प्रश्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १७:-* आज आपण प्रगतीच्या नावाखाली ज्या दिशेने वाटचाल करत आहोत, त्या वाटेवर एक अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उभा ठाकला आहे. — आपण नकळत कुटुंब व्यवस्थेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहोत का अलीकडील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पुढील काही वर्षांत जगातील सुमारे ४५ टक्के मुली अविवाहित राहू शकतात, ही बाब केवळ एक आकडा नाही, तर सामाजिक परिवर्तनाची ठळक नांदी आहे. शिक्षण, करिअर, स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वावलंबन या सकारात्मक गोष्टींच्या आडून एक वेगळाच वास्तव उभा राहत आहे — नात्यांपासून दूर जाण्याची प्रवृत्ती.

आजची मुलगी शिकलेली आहे, सक्षम आहे, स्वतःचे निर्णय घेऊ शकते — हे स्वागतार्ह आहे. पण त्याचवेळी विवाह, मातृत्व आणि कुटुंब याकडे “अडथळा” म्हणून पाहण्याची मानसिकता वाढते आहे, ही बाब चिंताजनक आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील सूक्ष्म रेषा आपण पुसून टाकत नाही ना, याचा विचार करणे गरजेचे आहे.

पूर्वीच्या काळात २०-२५ व्या वर्षी विवाह होत असत. त्यामुळे एका शतकात चार ते पाच पिढ्या एकत्र अस्तित्वात असत. आज विवाहाचे वय ३० च्या पुढे गेले आहे आणि परिणामी पिढ्यांची साखळीच कमी होत चालली आहे. उशिरा लग्न, उशिरा अपत्यप्राप्ती, आणि मग “एकच मूल” या संकल्पनेमुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे.

याचे दूरगामी परिणाम फारच गंभीर असू शकतात —रिकाम्या होत चाललेल्या गल्ल्या…ओस पडणारी गावे…उंच इमारतींमध्ये एकाकी जीवन जगणारे लोक…आणि वृद्धापकाळात सोबत देणारा कोणीच नसलेला समाज…हा “सुशिक्षित समाज” म्हणायचा, की स्वतःच्या मुळांपासून तुटलेला समाज?आज हजारो तरुण-तरुणी योग्य वयात विवाह न झाल्याने नैराश्याचा सामना करत आहेत. करिअरच्या मागे धावताना वैयक्तिक आयुष्य हातातून निसटत आहे. आणि जेव्हा स्थिर होण्याचा विचार येतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

यामध्ये केवळ तरुण पिढीच जबाबदार नाही, तर पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. स्वतः लवकर लग्न करून कुटुंब उभे करणारे पालक आज आपल्या मुलांच्या उशिरा लग्नाचा अभिमान बाळगतात — ही विसंगती आहे.विवाह हा केवळ एक सामाजिक करार नाही, तर तो समाजरचनेचा कणा आहे. कुटुंब हीच संस्कृती जपण्याची, मूल्ये पुढे नेण्याची आणि समाज टिकवण्याची सर्वात मजबूत व्यवस्था आहे. जर हीच व्यवस्था दुर्लक्षित झाली, तर त्याचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील.आज गरज आहे ती संतुलनाची —शिक्षण आणि कुटुंब…

करिअर आणि नातेसंबंध…स्वातंत्र्य आणि जबाबदारी…यामधील योग्य समन्वय साधणे हीच खरी प्रगती ठरेल.लग्नाचे योग्य वय हा केवळ आकड्यांचा प्रश्न नाही, तर तो मानसिक, सामाजिक आणि जैविक संतुलनाचा विषय आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आयुष्य अधिक स्थिर,समृद्ध आणि समाधानकारक बनवू शकतात.

जर आपण आजही या बदलाकडे दुर्लक्ष केले, तर इतिहास कदाचित कठोर शब्दांत लिहील —

“तो समाज, ज्याने स्वतःच्या प्रगतीच्या मोहात स्वतःचे अस्तित्वच धोक्यात घातले.”म्हणूनच आता थांबून विचार करण्याची वेळ आली आहे.आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत?आणि त्या दिशेचा शेवट नेमका कुठे आहे?कारण एक गोष्ट निर्विवाद आहे —कुटुंब नसेल,तर समाज टिकणार नाही…!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!