◾ मालवणात कृषी अधिकाऱ्याची किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
🖥️Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:मालवण
🎴मालवण, दि-०३:- मालवण तालुका कृषी कार्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन वसंत गवंडे (वय ५२) रा. भरड मालवण यांनी कार्यालयातच किटकनाशक पिल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गवंडे यांना सहकाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सचिन यांच्या विरोधात काही कार्यालयीन कर्मचारी यांनी तक्रार वरिष्ठांकडे तक्रार दिली होती. त्याची चौकशी सुरू होती. अशीही माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
मालवण पोलिसांना सचिन यांनी कीटकनाशक पिल्याची माहिती देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

