🛑कै.प्रा.अल्ताफ खान यांच्या स्मृती प्रित्यर्थ कळसुलकर हायस्कूलमध्ये डिजिटल वर्ग खोलीचे उद्घाटन.
*🛑कै.प्रा.अल्ताफ खान यांच्या स्मृती प्रित्यर्थ कळसुलकर हायस्कूलमध्ये डिजिटल वर्ग खोलीचे उद्घाटन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- १४:-* ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी च्या कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै.प्रा.अल्ताफ खान यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘डिजिटल वर्ग खोली’चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. हा सोहळा खान परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या डिजिटल कक्षाचे उद्घाटन खान सरांच्या भगिनी सौ. अमीना नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू श्री. अबिद खान, बहिण खैरू खान, भाची नूरजहा नाईक तसेच खान कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, खजिनदार श्री. मुकुंद वझे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. दत्तप्रसाद गोठोस्कर, संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, ॲड. नम्रता नेवगी, संचालक श्री. नीरज देसाई, हितचिंतक श्री. राजू मसुरकर, तसेच आरपीडी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. जगदीश धोंड व माडखोल हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. भरत गावडे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस.व्ही.भुरे यांनी प्रस्ताविकातून खान सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून खान सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कार्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. खान कुटुंबाच्या वतीने सौ.नूरजहा नाईक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
कै.अल्ताफ खान यांनी आपल्या अध्यापन काळात हजारो विद्यार्थ्यांना घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध, प्रेमळ स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. हिंदी विषयातील प्रभुत्व आणि वाचनाची आवड यामुळे त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली.
नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने खान परिवाराने हा डिजिटल कक्ष शाळेला भेट दिला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. दिगंबर सारंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.उत्तम पाटील यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

