🛑बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी अजय जोशी.
*🛑बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी अजय जोशी.*
*🛑पदविका प्राप्त पत्रकारांनाच संघटनेत प्रवेश – उपाध्यक्ष श्रद्धा ठोंबरे.*
*🛑संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध उपक्रम.*
*🛑शहराच्या विकास आणि भवितव्यासाठी कार्य सुरू – अध्यक्ष अजय जोशी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि- १४:-* बदलापूर शहरात डिजिटल माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यात येतात. त्यासोबतच शहरातील उभारण्यात आलेले मोठमोठे प्रकल्प सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येतात. शहरात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकारांना एकत्रित राहता यावं, यासाठी बदलापूर शहर डिजिटल मीडिया संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचा प्रथम प्रोटोकॉल म्हणजे पत्रकारिता पदविका प्राप्त झालेल्या पत्रकारांनाच या संघटनेत प्रवेश देण्यात आला आहे. डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत बदलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघटना शहरात काम करणार आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, डिजिटल संपादक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने, राज्य संघटक मयूर गलांडे, मुंबई अध्यक्ष शशिकांत देशमुख यांच्यासह नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे, गटनेते शरद तेली, आरोग्य समिती सभापती किरण भोईर, भाजपचे ज्येष्ठ नेते राम पातकर यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते नगरसेवक उद्योजक समाजसेवक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी अजय जोशी, उपाध्यक्षपदी श्रद्धा ठोंबरे, अनिकेत सोनवणे, सचिव पदी अमित गायकवाड, खजिनदारपदी ऋतिकेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. या संघटनेत प्रमुख सल्लागार म्हणून रवींद्र थोरात आणि कैलास जाधव काम करणार आहेत. स्थापना सोहळ्यात आयोजित करण्यात आलेला पहिला उपक्रम म्हणून संघटनेतील सर्व सदस्यांचा पाच लाखांचा विमा काढण्यात आलाय. यापुढे सुद्धा संघटनेच्या माध्यमातून शहरात पत्रकारांसाठी मार्गदर्शन शिबिर, सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिर आणि विविध उपक्रम राबवण्याचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष अजय जोशी यांनी त्यांच्या भाषणात दिली. तर आमच्या संघटनेचा प्रोटोकॉल आणि सर्व नियमावली ही कठोर असल्याची माहिती आभार प्रदर्शन करताना उपाध्यक्ष श्रद्धा ठोंबरे यांनी दिली.या संपूर्ण सोहळ्याचे चित्रीकरण आणि सुवर्णक्षण बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेचे कॅमेरामन साहिल काळे आणि मंथन गायकवाड यांनी चित्रित केले. ज्यांना कुणाला या संघटनेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी संघटनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, संघटनेच्या नियमावलीत बसणाऱ्या पत्रकारांनाच संघटनेत प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांशी चर्चा करताना दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

