कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ जंगलातील भेडले माडाची तोड तात्काळ थांबवा; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन करु ; स्वागत नाटेकर यांचा इशारा

 

🖥️Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी:अंकुश नाईक

🎴ठिकाण:सावंतवाडी

🎴 सावंतवाडी,दि-०३:- सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून जंगलात भेडले माडाची तोड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, परप्रांतीय कामगारांना घेऊन काही स्थानिक मालक वनविभागाच्या हद्दीतील भेडले माड तोडत आहेत, परिणामी वन्यप्राणी खाद्यासाठी आत्ता नजीकच्या माड बागायतीत येऊन नुकसान करत आहेत.वन्यप्राण्यांचे खाद्यच नष्ट झाल्यामुळे माकड,शेखरु यासारखे वन्यप्राणी आज बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.हॉर्नबील सारखा पक्षी सुद्धा आज बागायतीमधील नारळ खाताना दिसत आहे, वनविभागाने तात्काळ या कामगारांवर आणि संबंधित मालकांवर कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या कालावधीत शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा इन्सुली ग्रामपंचायत सदस्य श्री स्वागत नाटेकर यांनी दिला आहे.तसे वनविभागाला आज निवेदन देण्यात आले यावेळी औंदुबर पालव,उमेश पेडणेकर, मंगेश राठवड,सुर्या पालव,स्वागत नाटेकर, आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!