पुणे शहरात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई; ४७ ठिकाणी तपासणी, विविध गुन्ह्यांत कारवाई
पुणे शहरात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई; ४७ ठिकाणी तपासणी, विविध गुन्ह्यांत कारवाई
पुणे, दि. १२ एप्रिल २०२६ – शहरातील सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी आणि वाढत्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मोठी तपासणी मोहीम राबवली. ही मोहीम सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पार पडली.
,पुणे शहरातील फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागा, ब्लॅक स्पॉट्स आणि सार्वजनिक ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. एकूण ४७ ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध कायद्यांअंतर्गत कारवाई करत गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला. त्यात:भा.न्या.सं. कलम २८५ अंतर्गत २ गुन्हे दाखल,कोटपा कायद्यान्वये १६ खटले,ट्रिपल सीटवरून ४४ जणांवर कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत १९ खटले मोटार वाहन कायद्यान्वये ४ कारवाया
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ८ गुन्हे नोंद,आरोपी तपासणी ३,ही मोहीम पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. तसेच सह पोलीस आयुक्त राजकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावल यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.
परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होणार आहे.
पुणे पोलिसांची ही मोहीम भविष्यातही अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

