कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नवीन काळाशी जुळवून घेऊन संस्काराची मुळे घट्ट ठेवा-जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत.

*🛑नवीन काळाशी जुळवून घेऊन संस्काराची मुळे घट्ट ठेवा-जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत.*

 

*🛑शिक्षक समिती सावंतवाडीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०९:-* शिक्षकांच्या विचारांना दिशा देणारे,अनुभवांची देवाणघेवाण घडवणारे आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवणारे अधिवेशन हे व्यासपीठ आहे. शिक्षकहो,”नवीन काळाशी जुळवून घ्या,पण आपल्या संस्कारांची मुळे घट्ट ठेवा.”

“तंत्रज्ञानाचा वापर करा,पण मानवी मूल्ये विसरू नका.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा सावंतवाडीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना केले.

शिक्षक समिती सावंतवाडीचे त्रैवार्षिक अधिवेशन मांगिरिश हॉल येथे पार पडले.यावेळी उद्घाटक म्हणून जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित होते.तालुकाध्यक्ष समीर जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अधिवेशनात पं.स.सभापती सुस्मिता जाधव,समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर,जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक,गटशिक्षणाधिकारी सविता परब,

ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण,नंदकुमार राणे,प्रमुख वक्ते सुधाकर सावंत,शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे,संचालक नारायण नाईक,राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर,प्रशांत मडगावकर,निलम बांदेकर,सचिन मदने,संतोष परब,शंकर वजराटकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड,धीरज हुंबे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.कामत यांनी आपला जिल्हा हा शिक्षणात अग्रेसर आहे.आपल्या शिक्षकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी करून दर्जेदार शिक्षण दिले ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे.आपल्या समस्या,अडचणी आणि अपेक्षा याकडे जिल्हा परिषद नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहील.

शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी,शाळांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, शिक्षकांना सक्षम वातावरण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी,गुणवंत शिक्षक यांचा यथोचित गौरव करण्यात आला.प्रमुख वक्ते सुधाकर सावंत यांनी संघटन महत्व अनेक दाखले देत विशद करताना कार्यकर्त्यांनी संघटन चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.सभापती श्रीम.जाधव यांनी शिक्षक अधिवेशनातून नवीन संकल्पना निर्माण होऊन सर्वांनी अधिक ऊर्जा घ्यावी असे सांगितले.राज्य महासचिव श्री.कोरगावकर यांनी शिक्षण,शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विद्यमान समस्या मांडताना संघटन चळवळीचे महत्व विशद केले.जिल्हाध्यक्ष श्री.गवस यांनी जिल्हयातील शैक्षणिक समस्या सोडवणुकीसाठी आता हक्काचे व्यासपीठ म्हणून लोकप्रतिनिधी निश्चित साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमात शिक्षक पतपेढीचे संचालक संतोष मोरे,विजय सावंत,संतोष राणे,मंगेश कांबळी,श्रीकृष्ण कांबळी,सीताराम लांबर,ऋतुजा जंगले,तालुकाध्यक्ष शशांक आटक,महेश काळे,प्रसाद जाधव,सुशांत मर्गज,विवेकानंद कडू,सावंतवाडी तालुका पदाधिकारी हेमंत सावंत,गोविंद शेर्लेकर,प्रसाद दळवी,सतीश राऊळ,शिल्पा जाधव,धनदा शिंदे यांचेसह जिल्हा,तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावंतवाडी महिला आघाडीने सुश्राव्य ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले.जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जावेद तांबोळी यांनी तालुका कार्याचा आढावा घेणारी चलचित्रफित सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष समीर जाधव यांनी,सूत्रसंचालन उत्तम पाटील व सत्यजित वेतूर्लेकर यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर गावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सावंतवाडी समिती शिलेदारांनी मेहनत घेतली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!