आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्गात सरपंचांची एकजूट; विकासासाठी नवी समिती कार्यरत

🛑 गणेशप्रसाद गवस अध्यक्षपदी; गावपातळीवरील प्रश्न सोडवण्यावर भर

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग, दि-०८:- तालुक्यातील ग्रामविकासाला गती देण्यासाठी पंचायत समिती दोडामार्ग अंतर्गत सरपंच समितीची स्थापना करण्यात आली असून उपसभापती गणेशप्रसाद शंकर गवस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेमुळे गावपातळीवरील विविध प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यास मदत होणार असून प्रशासन आणि ग्रामपंचायती यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास अध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी व्यक्त केला.

नव्याने गठित करण्यात आलेल्या या सरपंच समितीत एकूण १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध गावांतील सरपंचांना प्रतिनिधित्व देत समितीची रचना करण्यात आली आहे. समितीतील सदस्यांमध्ये अनिल दत्ताराम शेटकर, छाया सखाराम धर्णे, बळीराम कृष्णा शेटये, अस्मिता अनिल गवस, सुजल सूर्यकांत गवस, हरिश्चंद्र गंगाराम नाईक, वंदना आनंद सावंत, अजित मनोहर देसाई, स्नेहा सहदेव गवस, श्रीनिवास मुकुंद शेटकर, सुरेंद्र संभाजी सावंतभोसले, श्रुती विठ्ठल देसाई, पराग महादेव गावकर, प्रकाश जयाराम कदम आणि देवेंद्र रामकृष्ण शेटकर यांचा समावेश आहे.

ही समिती ग्रामपातळीवरील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच ग्रामस्थांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ही सरपंच समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. नव्या समितीकडून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, संजय सातार्डेकर, आदर्श गाव केरचे उपसरपंच तेजस देसाई, कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे, हेवाळे सरपंच साक्षी देसाई यांसह अनेक सरपंच उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!