कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांद्यात भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून डिजिटल स्मार्ट बोर्डचे अनावरण.

*🛑बांद्यात भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून डिजिटल स्मार्ट बोर्डचे अनावरण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०७:-* भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ.व्ही. के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात डिजिटल स्मार्ट बोर्डचे अनावरण करण्यात आले. भाजपचे आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हा Intellectual Digital Board मंजूर करण्यात आला असून त्याचे हस्तांतरण व अनावरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अनावरण भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई व भाजप बांदा शहराध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंडळ उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत,निलेश नाटेकर,प्रवीण देसाई,सिद्धेश महाजन आदी उपस्थित होते.

बांदा दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात खेमराज प्रशालेचा मोठा वाटा आहे. येथे माध्यमिक शिक्षणाबरोबरच कला,वाणिज्य, विज्ञान तसेच व्यावसायिक अशा उच्च माध्यमिक शाखांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक अध्यापन पद्धतीचा लाभ मिळावा या उद्देशाने हा डिजिटल स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यासाठी भाजपचे बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे पाठपुरावा करून ही सुविधा शाळेला मिळवून दिली. याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी बोलताना श्वेता कोरगावकर यांनी बदलत्या काळातील शिक्षणपद्धतीत डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी या डिजिटल बोर्डचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिक परिणामकारक बनवावे,असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी माजी मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक, प्राचार्य प्रदीप देसाई,पर्यवेक्षक प्रमोद सावंत, उपप्राचार्या मिलन वसकर,शिक्षक अनिकेत सावंत, गंगाधर काळे, दीपा सावंत,आपा राऊळ,सचिन नाईक,शबाना खान तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणधीर रणसिंग यांनी केले तर आभार प्रमोद सावंत यांनी मानले.बदलत्या शिक्षण प्रवाहाचा विचार करून आमदार निरंजन डावखरे यांनी शाळेला ही आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!