🛑हळदिचे नेरुर येथे चर्मकार समाजाला मंदिर प्रवेश;सामाजिक एकजुटीचा विजय.
*🛑हळदिचे नेरुर येथे चर्मकार समाजाला मंदिर प्रवेश;सामाजिक एकजुटीचा विजय.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴कुडाळ, दि- ०७:-* हळदिचे नेरुर येथील रांजणवाडी चर्मकार समाज बांधवांनी दीर्घकाळ चालत आलेल्या अन्यायाविरोधात एकजूट दाखवत अखेर गावातील श्री ग्रामदेवता जटाशंकर मंदिर, गणपती मंदिर व सातेरी मंदिर येथे प्रवेश मिळवून सामाजिक समतेचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
वर्षानुवर्षे मागासवर्गीय असल्याच्या कारणावरून मंदिर प्रवेश नाकारला जात असल्याने समाजात नाराजीचे वातावरण होते. ही अन्यायकारक परंपरा थांबवण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येत ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांकडे दाद मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या आंदोलनासाठी चर्मकार समाज संघटना व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापक पाठिंबा उभारण्यात आला. महेश नारकर, भरत नेरकर, भाई नेरकर, श्रावण नेरकर, अशोक नेरकर, राजन नेरकर, रवींद्र नेरकर, निळकंठ चव्हाण, गणपत नेरकर, कैलास नेरकर, सचिन चव्हाण, अक्षय चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेत समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणले.
३० मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात मंदिर मानकरी व समाज बांधवांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मानकरी अनुपस्थित राहिल्याने निर्णय होऊ शकला नाही. या बैठकीत सिंधुदुर्ग चर्मकार समाज उन्नती मंडळाचे राजन वालावलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अमित चव्हाण व पत्रकार जाधव यांनी कायदेशीर मुद्दे मांडले.
यानंतर ३१ मार्च रोजी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे व कुडाळ पोलीस निरीक्षक मगदूम यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी ४ एप्रिल रोजी गावात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
ठरल्याप्रमाणे ४ एप्रिल रोजी तहसीलदार, पोलीस अधिकारी व संबंधित यंत्रणा गावात दाखल झाली. सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत चर्मकार समाज बांधवांना मंदिर प्रवेश देण्यात आला.
या प्रक्रियेत संतोष चव्हाण, अमित चव्हाण, पत्रकार संदीप चव्हाण, तसेच सुजित जाधव, संजय (छोटू) कदम, बीडीओ विजय चव्हाण, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, परशुराम चव्हाण, उदय शिरोडकर, मधुकर चव्हाण, के. टी. चव्हाण, चंद्रसेन पाताडे, गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण, रामदास चव्हाण, श्रीराम चव्हाण, मनोहर सरमळकर आदींचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
दीर्घकाळ चालत आलेल्या भेदभावाला अखेर पूर्णविराम मिळाल्याने समाज बांधवांत समाधानाचे वातावरण असून, हा निर्णय सामाजिक ऐक्य व न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

