कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शासकीय महिला कर्मचाऱ्याला ‘लाडकी बहीण’चा लाभ भोवला.

*🛑शासकीय महिला कर्मचाऱ्याला ‘लाडकी बहीण’चा लाभ भोवला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ३१:-* शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी मालवण पंचायत समितीत परिचरपदावर कार्यरत असलेल्या मीनाक्षी नाना गोडगे या महिला कर्मचाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सेवेतून निलंबित केले आहे.

ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेतल्यास त्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंग आणि पैसे वसुलीची कारवाई केली जाईल,असे स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, योजना प्रत्यक्ष अमलात आल्यानंतर शासनाने सर्व महिलांच्या आधार कार्डनुसार पडताळणी मोहीम हाती घेतली होती. त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांची यादी, आधार नंबर व अन्य अनुषंगिक माहिती मागविण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने मीनाक्षी गोडगे यांनी नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत गोडगे यांना निलंबित केले आहे. त्यानंतर त्यांना सेवेतून बंडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल, असेही खेबुडकर यांनी स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षक नाना गोडगे यांचे सेवेत असतानाच निधन झाल्याने त्यांच्या जागी अनुकंपा अंतर्गत मीनाक्षी गोडगे २०२२ मंध्ये सेवेत दाखल झाल्या होत्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!