कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोस रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन !

*🛑आरोस रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* आरोस गावातील मुख्य रस्ता पूर्णतः खराब झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. २०१५-१६ मध्ये तयार झालेला हा रस्ता सध्या खड्डेमय बनला असून अपघातांचा धोका वाढला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोस-दांडेली या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये हा रस्ता तयार करण्यात आला होता.मात्र, सध्या या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.डांबरीकरण उखडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढतो.या खराब रस्त्यामुळे एसटी बस तसेच इतर वाहने गावात येण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार लेखी अर्ज व पाठपुरावा केला, मात्र संबंधित विभागाकडून केवळ तोंडी आश्वासनेच देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

*ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष*

सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जर लवकरात लवकर दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामसडक योजनेकडे तातडीने दखल घेऊन रस्त्याची मे महिन्यापूर्वी दुरुस्ती करावी. अन्यथा प्रशासनास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे माजी सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!