कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शुभम घावरे यांनी वाढदिवसाला दिली अनोखी भेट.

सामाजिक कार्यकर्ते शुभम रावजी घावरे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला कमोड चेअर दिली.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान द्वारे रुग्णांसाठी रुग्णोपयोगी साहित्य पुरवले जाते.अनेक दानशूर यासाठी या संस्थेला सहकार्य करतात आज सामाजिक कार्यकर्ते शुभम रावजी घावरे बीरोडकर टेंब यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन आपल्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांच्या कार्यालयात भेट देऊन गोरगरीब रुग्णांसाठी संस्थेकडे कमोड चेअर दिली. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, शरदिनी बागवे व लक्ष्मण कदम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!