कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गात कायदा विकला गेला आहे का? – हप्तेखोर यंत्रणांचा नागडा नाच!

*🛑सिंधुदुर्गात कायदा विकला गेला आहे का? – हप्तेखोर यंत्रणांचा नागडा नाच!*

 

*🛑पोलिस यंत्रणा सुशेगाद, जिल्ह्यात अवैध धंदे,अमंली पदार्थ जोमात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २८:-* सिंधुदुर्ग… निसर्गाच्या कुशीतला हा जिल्हा आज एका भयावह वास्तवाशी झुंजतोय. पण ही झुंज बाहेरच्या शत्रूशी नाही — ती आहे घरातल्या “रक्षकांशी”!होय, ज्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (LCB) कायद्याची अंमलबजावणी करायची, त्या यंत्रणांनीच कायद्याचा “लिलाव” लावल्याची भावना आज जनतेच्या मनात खोलवर घर करून बसली आहे.

*गोवा बनावटीची दारू – उघड उघड मोकाट!*

गोव्याहून येणारी बनावट, विषारी दारू सिंधुदुर्गात इतक्या बिनधास्तपणे कशी फिरते?

हा प्रश्न आता भोळेपणाचा राहिलेला नाही. कारण उत्तर सरळ आहे — ही वाहतूक थांबवली जात नाही, ती “सुरक्षितपणे पोहोचवली” जाते!

तपासणी नाके म्हणजे कायद्याचे बुरुज नसून, “हप्त्याचे टोल नाके” बनल्याची चर्चा लोकांत उघडपणे होतेय.

*हप्त्याची व्यवस्था – शिस्तबद्ध भ्रष्टाचार!*

या जिल्ह्यात बेकायदेशीर धंदा चालवायचा असेल, तर नियम एकच — “हप्ता भरा आणि मोकळे फिरा!”

दारू असो, गांजा असो, चरस-अफू असो — प्रत्येकासाठी दर ठरलेले.

ही फक्त अफवा नाही, तर रोजच्या व्यवहारातून तयार झालेली “सिस्टिम” आहे, असा आरोप स्थानिकांकडून वारंवार केला जातो.

राज्य उत्पादन शुल्क विभाग – आकडेवारीचा खेळ, वास्तव शून्य!

हा विभाग कागदावर कारवाया दाखवतो, प्रेस नोट्स काढतो… पण प्रत्यक्षात मोठे रॅकेट अबाधित राहतात.एखाद्या छोट्या गाडीवर कारवाई करून फोटो काढले जातात, पण हजारो लिटरची तस्करी करणारे “मोठे खेळाडू” हात लावायच्या बाहेरच राहतात.कारण ते हात “भरलेले” असतात का? हा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे.

LCB – गुन्हे शोधायचे की गुन्हे झाकायचे?स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची भूमिका तर अधिकच संशयास्पद वाटते.

ज्या शाखेने गुन्हेगारीचा माग काढायचा, तीच शाखा “कोणाला हात लावायचा आणि कोणाला वाचवायचं” याचं राजकारण खेळतेय, अशी धारणा आहे.

ज्याच्याकडून हप्ता नाही, त्याच्यावर धाड — आणि ज्याच्याकडून आहे, त्याच्याकडे “दुर्लक्ष”!हा न्याय आहे का, की निव्वळ बाजार?असा प्रश्न विचारला जातोय!

*युवकांची कत्तल – जबाबदार कोण?*

या विषारी साखळीचा सर्वात मोठा बळी म्हणजे सिंधुदुर्गातील तरुण.

स्वस्तात मिळणारी निकृष्ट दारू, सहज उपलब्ध होणारे ड्रग्स — यामुळे अनेक तरुण व्यसनाधीनतेच्या खाईत ढकलले जात आहेत.

त्यांचे भविष्य अंधारात जात असताना, संबंधित यंत्रणा मात्र “हप्त्याच्या उजेडात” न्हाऊन निघत आहेत.

*प्रशासन आणि राजकारण – गप्प का?*

इतकं सगळं उघडपणे घडत असताना, वरिष्ठ अधिकारी गप्प का? आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे वगळा इतर विरोधी पक्षाचा आवाज कुठे ऐकायला येत नाही? या साखळीत वरपर्यंत “हिस्सा” पोहोचतो, म्हणूनच सगळे शांत आहेत?जर तसं नसेल, तर तात्काळ कठोर कारवाई का होत नाही?

*जनतेचा इशारा – आता सहनशक्ती संपत आली!*

सिंधुदुर्गातील जनतेला आता उत्तर हवं आहे.ही “हप्ता संस्कृती” थांबवायची की वाढवायची?

कायद्याचे रक्षक पुन्हा रक्षक बनणार की कायमचे भक्षकच राहणार?

आता एकच मार्ग – धडक कारवाई!

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि LCB मधील प्रत्येक अधिकाऱ्याची आर्थिक चौकशी झाली पाहिजे.गरज पडल्यास बाहेरील एजन्सी किंवा विशेष तपास पथक (SIT) नेमून संपूर्ण जाळं उध्वस्त केलं पाहिजे

सिंधुदुर्ग वाचवायचा असेल, तर “हप्तेखोर यंत्रणांचा” अंत करावाच लागेल.नाहीतर उद्या इतिहास लिहिला जाईल —“या जिल्ह्याला गुन्हेगारांनी नाही, तर रक्षकांनीच संपवलं!”

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!