डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
◾डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये डॉ. अनंत नागवेकर यांच्या हस्ते या लसीकरणाचा शुभारंभ
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १ येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या उपस्थितीत खाजगी रुग्णालयांमध्ये सुरु करावयाच्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात खासगी दवाखान्यांमध्ये २५० रुपयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक, तसेच ४५ ते ५९ वयोगटातील विविध प्रकारच्या आजारांचा त्रास असलेल्यांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ. महेश खलीपे यांनी सांगितले.
डॉक्टर नागवेकर हॉस्पिटलमध्ये डॉ. अनंत नागवेकर यांच्या हस्ते या लसीकरणाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला असला तरीही, प्रत्यक्षात लसीकरण गुरुवारपर्यंत सुरू होईल असे डॉ. खलीपे यांनी सांगितले. यावेळी डॉ. कीर्ती नागवेकर, डॉ. मयूर नागवेकर, डॉ. मीनल नागवेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. प्रशांत मडव, आरोग्य विस्तार अधिकारी आर. डी. जोशी, प्रशांत बुचडे व इतर उपस्थित होते.
जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना लसीकरणाचा हा शुभारंभ करण्यात आला असुन, यासाठी आवश्यक यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये सज्ज करण्यात आली आहे. यात वेटिंग रूम, लसीकरण रूम, विश्रांती रूम आधी अत्यावश्यक सेवा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत.
६० वर्षावरील नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील लोकांना ज्यांना किडनी, फुफ्फुस, हृदयरोग, यकृत रोग अशा स्वरूपाच्या समावेश करण्यात आलेल्या २० आजारांचा त्रास असल्याबाबत नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी कोवीड १९ आणि आरोग्य सेतु याठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून, तसेच अत्यावश्यक वेळी आधार कार्डच्या माध्यमातुनही नोंद करून लस देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयात एक नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असुन, या संपुर्ण लसीकरणाची जबाबदारी त्यांच्यामार्फत पुर्ण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये सुमारे २५ हजार डोस प्राप्त झाले होते. आतापर्यंत १५ हजार डोस देण्यात आले असुन, शिल्लक डोस देण्याची कार्यवाही सुरू आहे.
खाजगी दवाखान्यांना आरोग्य विभागाकडुन डोस पुरविण्यात येणार असुन, दिवसाला साधारण १०० डोस देणे अपेक्षित आहे. सदर डोस खाजगी दवाखान्यात आरोग्य विभागाकडुन पोहोच करण्यात येणार आहेत. ज्यांना ऑनलाईन डोसा साठीची नोंदणी शक्य नाही, ते या हॉस्पिटल मधील 8645095555 या क्रमांकावर संपर्क साधुन नोंदणी करू शकतात, असे डॉक्टर खलीपे यांनी सांगितले.
नागरिकांनी गर्दी न करता शक्यतो आगाऊ नोंदणी करूनच लस घ्यावी. तसेच एकदा लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी बुस्टर डोस घेणेही आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

