कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसिंधुदुर्ग

🛑”२४८ कोटींच्या ठाणे शेअर बाजार महाघोटाळ्याचा खरा चेहरा कोण?“

*🛑”२४८ कोटींच्या ठाणे शेअर बाजार महाघोटाळ्याचा खरा चेहरा कोण?“*

 

*🛑सागर कारिवडेकर कोणत्या बिळात लपला?.. पोलीस यंत्रणा कुचकामी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ११:-* कोविडच्या काळात सामान्य माणूस नोकरी, व्यवसाय आणि उदरनिर्वाहाच्या चिंतेत अडकला होता. अनेकांनी आयुष्यभराची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा थोडा अधिक परतावा मिळावा या आशेने गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडला. पण याच असहाय परिस्थितीचा फायदा घेत काही धूर्त लोकांनी शेअर बाजार प्रशिक्षण आणि गुंतवणूक मार्गदर्शनाच्या नावाखाली एक भलीमोठी आर्थिक लूट उभी केली.

ठाण्यात उघडकीस आलेला शेअर बाजार महाघोटाळा हा केवळ आर्थिक फसवणूक नसून सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा निर्लज्ज विश्वासघात आहे. सुरुवातीला १८० कोटींचा आकडा सांगून या घोटाळ्याची व्याप्ती लहान दाखवण्याचा प्रयत्न झाला; मात्र बँक व्यवहारांच्या नोंदी सांगतात की ही रक्कम प्रत्यक्षात तब्बल २४८ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच हा साधा घोटाळा नसून एक सुनियोजित आर्थिक डाका आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर कारिवडेकर कोणत्या बिळात लपला याचा शोध घेणे गरजेचे आहे व बंटी बबली आता जरी सागर कारिवडेकर च्या नावाने डांगोरा पिटत असली तरी त्या राणे व सागर कारिवडेकर हे एकच असल्याचे निष्पन्न होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे

गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या प्रमुख व्यक्तीचे नावच मुख्य FIR मधून गायब असल्याची बाब. ज्यांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखवले, करार केले, पैसा गोळा केला त्या व्यक्तीला पोलिसांच्या कागदोपत्री गुन्ह्यातून गायब करणे हा साधा योगायोग मानायचा का? की ही एखाद्याला वाचवण्याची पद्धतशीर खेळी आहे? हा प्रश्न आज सर्वसामान्य गुंतवणूकदार विचारत आहेत.

या प्रकरणात चार कुटुंबांच्या संगनमताचा संशय व्यक्त होत आहे. गुंतवणूकदारांकडून उकळलेला पैसा थेट नातेवाईकांच्या खात्यात वळवणे, त्यातून करोडोंच्या मालमत्ता खरेदी करणे आणि त्याच वेळी उत्पन्न फक्त काही लाख दाखवणे — ही केवळ आर्थिक अनियमितता नाही तर थेट मनी लॉन्डरिंगचा गंभीर प्रकार आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे तपास यंत्रणांनी या प्रकरणात लागू होऊ शकणाऱ्या अनेक कठोर कायद्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. SEBI कायदा, मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा, दूरसंचार कायदा २०२३ आणि ग्राहक संरक्षण कायदा — या सर्वांचा या घोटाळ्यात स्पष्ट संबंध दिसून येतो. तरीही तपासात त्यांचा उल्लेख नसणे ही केवळ त्रुटी नाही; ती संशयाला आमंत्रण देणारी बाब आहे.

दरमहा ४ ते ५ टक्के निश्चित परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांना जाळ्यात ओढणे हे आर्थिक गुन्ह्याचे क्लासिक मॉडेल आहे. पण या प्रकरणात ते इतक्या मोठ्या प्रमाणात घडले की हजाराहून अधिक कुटुंबांची बचत अक्षरशः एका क्षणात उडाली. अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी, घरासाठी किंवा निवृत्तीच्या सुरक्षिततेसाठी साठवलेले पैसे या जाळ्यात अडकले.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा तपास खरोखरच पूर्ण सत्यापर्यंत जाईल का? की काही काळ गाजल्यानंतर हा घोटाळा कागदोपत्री मर्यादित राहील?

आज गरज आहे ती केवळ गुन्हा दाखल करण्याची नाही तर निर्भीड आणि निष्पक्ष तपासाची. जर खरंच २४८ कोटी रुपयांचा पैसा सामान्य नागरिकांकडून लुटला गेला असेल, तर त्या पैशाचा प्रत्येक रुपया कुठे गेला याचा मागोवा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असल्यास सक्तवसुली संचालनालय, SEBI आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी पुढे येणे अपरिहार्य आहे.

लोकशाहीत कायदा सर्वांसाठी समान असतो, असे आपण वारंवार म्हणतो. पण जर करोडोंची लूट करूनही काही लोक कायद्याच्या पळवाटांमधून सुटत असतील, तर तो केवळ

न्यायव्यवस्थेचा अपमान नसून समाजाच्या विश्वासावर घाला आहे.

गुंतवणूकदारांचा पैसा हा केवळ आकडा नसतो; तो त्यांच्या आयुष्याची कमाई असते. त्या पैशाची लूट करणाऱ्यांना जर अभय मिळाले, तर उद्या कोणताही सामान्य नागरिक कोणत्याही आर्थिक व्यवस्थेवर विश्वास ठेवणार नाही.

म्हणूनच या ठाणे शेअर बाजार महाघोटाळ्याचा तपास हा केवळ एका गुन्ह्याचा तपास नाही. तो न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेची कसोटी आहे.

*आता प्रश्न एकच*

२४८ कोटींच्या या महाघोटाळ्याचे खरे सूत्रधार कायद्याच्या कचाट्यात येणार, की पुन्हा एकदा “राणे निघाले शहाणे… करोडो उडवले आणि म्हणाले घ्या शेंगदाणे” हीच कहाणी इतिहासात नोंदली जाणार?हाच खरा प्रश्न आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!