ठाणेमहाराष्ट्र

🛑ठाणे शेअर बाजार महाघोटाळा : १८० नव्हे तर तब्बल २४८ कोटींचा घोटाळा!

*🛑ठाणे शेअर बाजार महाघोटाळा : १८० नव्हे तर तब्बल २४८ कोटींचा घोटाळा!*

 

*🛑‘राणे निघाले शहाणे… करोडो उडवले आणि म्हणाले घ्या शेंगदाणे!’*

 

*🛑सागर कारिवडेकर या महाघोटाळ्याचा खरा सुत्रधार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ठाणे, दि- १०:-* शेअर बाजार प्रशिक्षणाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ठाणे येथील बहुचर्चित आर्थिक घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव आता समोर येऊ लागले आहे. सुरुवातीला १८० कोटींचा घोटाळा असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात या आर्थिक फसवणुकीचा आकडा तब्बल २४८.१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे बँक खात्यांच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात १,२४६ गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची अधिकृत नोंद असून कोविड लॉकडाऊनच्या काळात शेअर बाजार प्रशिक्षण आणि गुंतवणूक सल्लागार सेवा देण्याच्या नावाखाली हजारो लोकांना जाळ्यात ओढण्यात आले. दरमहा ४ ते ५ टक्के निश्चित परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले.

*‘बंटी-बबली’ मॉडेलने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले*

या संपूर्ण घोटाळ्यात सचिन राणे हा शेअर बाजाराचा ‘एकमेव मार्गदर्शक’ म्हणून पुढे आला, तर प्रिती राणे ही गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा प्रमुख चेहरा होती. गुंतवणूकदारांशी बनावट MoU करार नोटरी करून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र मे २०२४ पासून अचानक परतावा बंद झाला आणि त्यानंतर आरोपींनी अक्षरशः पोबारा केल्याचे उघड झाले आहे.

*चार कुटुंबांचे संगनमत?*

तपासात उघड झालेल्या बँक व्यवहारांनुसार हा केवळ दोन व्यक्तींचा गुन्हा नसून राणे, मोरे, कारिवडेकर,आणि सुर्वे या चार कुटुंबांच्या संगनमताचा मोठा कट असल्याची शंका व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे थेट प्रिती राणेच्या पालकांच्या खात्यात वळवण्यात आल्याचे व्यवहारातून समोर आले आहे.

नरेश मोरे : २.८८ कोटी रुपये

रेखा मोरे : ४.६६ कोटी रुपये

अशा प्रकारे सुमारे ७.५ कोटी रुपये हस्तांतरित करून त्यातून आलिशान मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.

घोषित उत्पन्न फक्त २४ लाख… पण खात्यात जमा १०.७६ कोटी!

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपींकडून घोषित करण्यात आलेले उत्पन्न फक्त २४.०७ लाख रुपये असताना त्यांच्या खात्यांमध्ये प्रत्यक्षात १०.७६ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे नोंदींमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी आणि मनी लॉन्डरिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

*मुख्य सूत्रधाराचे नावच FIR मधून गायब!*

या प्रकरणातील सर्वात मोठा संशयास्पद मुद्दा म्हणजे ठाणे पोलिसांच्या FIR क्रमांक 0055/2026 मधून प्रिती राणेचे नावच वगळण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी आणि निधी हाताळणारी प्रमुख व्यक्ती असल्याचे आरोप असतानाही तिचे नाव FIR मध्ये नसल्यामुळे पोलीस कोणाला वाचवत आहेत? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

*आंबोली आणि ठाणे FIR मध्ये मोठा विरोधाभास*

या घोटाळ्याबाबत आंबोली पोलिसांनी दाखल केलेल्या FIR क्रमांक 0017/2026 मध्ये व्यापक कट आणि सर्व आरोपींच्या सहभागाची नोंद आहे. मात्र ठाणे FIR मध्ये अत्यंत मर्यादित आणि कमकुवत आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे गुन्ह्याची खरी व्याप्ती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावत आहे.

*कठोर कायद्यांकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?*

तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात खालील कठोर कायदे लागू होऊ शकतात, मात्र ते FIR मध्ये दिसत नाहीत :

SEBI कायदा (कलम 11AA) : नोंदणी नसलेल्या सामूहिक गुंतवणूक योजनांवर बंदी

PMLA (मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा)

Telecom Act 2023 (डिजिटल संदेशाद्वारे फसवणूक)

ग्राहक संरक्षण कायदा 2019 (फसव्या जाहिराती)

RS Consultancy आणि Mind Stock Innovations या कंपन्या SEBI कडे नोंदणीकृत नसतानाही त्यांनी कोट्यवधींचा निधी गोळा केला. तरीही पोलिसांनी SEBI कायद्याचा उल्लेखही न केल्याने संशय वाढला आहे.

*डिजिटल नेटवर्कद्वारे फसवणूक*

डिजिटल माध्यमांद्वारे ‘Guaranteed 5% Returns’ अशा संदेशांचा मारा करून १,२४६ लोकांना जाळ्यात ओढण्यात आले, असा आरोप आहे. मात्र आधुनिक डिजिटल गुन्ह्यांसाठी लागू होणाऱ्या कायद्यांचा तपासात समावेशच करण्यात आलेला नाही.

आता तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्या!

या महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पीडित गुंतवणूकदारांनी पुढील मागण्या केल्या आहेत :

ठाणे FIR मधील त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात.

प्रिती राणेचे नाव मुख्य आरोपी म्हणून समाविष्ट करावे

ED आणि SEBI यांनी तपास तातडीने हाती घ्यावा

गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी कठोर कारवाई करावी.

दरमहा ५ टक्के परताव्याचे स्वप्न दाखवून सामान्य नागरिकांचा २४८ कोटी रुपयांचा पैसा लाटणाऱ्या या महाघोटाळ्याचा खरा चेहरा उघड करण्यासाठी आता पारदर्शक आणि निष्पक्ष तपास होणे अत्यावश्यक असल्याची मागणी सर्वत्र होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!