🛑झोळंबे शिमगोत्सवाचा थरार; आज न्हावण कळसाचा अद्भुत सोहळा.
*🛑झोळंबे शिमगोत्सवाचा थरार; आज न्हावण कळसाचा अद्भुत सोहळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* झोळंबे गावातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रीय शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून मंगळवार, १० मार्च रोजी पारंपरिक न्हावण कळसाचा अद्भुत सोहळा पार पडणार आहे. बत्तीच्या उजेडात डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन, हात न धरता बारा पाचासह धावत जाणारा शिवशंभो अर्थात न्हावणाचा हा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे.
या शिमगोत्सवातील हा क्षण अत्यंत रोमांचक, भक्तीभावाने भारलेला आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा मानला जातो. देव डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन बारा पाचासह वेगाने धावत निघतो, तेव्हा उपस्थित भाविकांना दैवी शक्तीची अनुभूती मिळाल्याचा भावनिक अनुभव येतो.
होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर दररोज रात्री मांडावरून रोंबाट चव्हाट्यावर येतात. सातव्या दिवशी रविवारी गावाबाहेरील वाड्यांचे रोंबाट तसेच राधा खेळ पार पडला. आठव्या दिवशी सोमवारी सकाळी राधा-कृष्ण खेळ झाला, तर सायंकाळी रोंबाट झाले. सनई, ढोल-ताशे आणि झांजांच्या तालावर नाचत हे रोंबाट कुळघराकडून गावठाण फिरून चव्हाट्यावर आले. त्यानंतर पहाटे पालखीसह देवाचे रोंबाट पार पडले.
नवव्या दिवशी मंगळवारी दुपारी होळीवर धूळ मारल्यानंतर सायंकाळी न्हावणाचा कळस चव्हाट्यावरून माऊली मंदिरात आणून पूजा केली जाते. त्यानंतर देव डोक्यावर न्हावणाचा कळस घेऊन बारा पाचासह हात न धरता धावत निघतो. या अद्भुत सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उभे राहतात.
संपूर्ण गावठाण फिरून देव पुन्हा रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास चव्हाट्यावर येतो. बत्तीच्या उजेडात कळसाला हात न लावता देव बारा पाचासह मंदिराकडे येऊन काही वेळ खेळतो. हा विलोभनीय क्षण पाहताना प्रत्येक भाविकाला दैवी शक्तीची अनुभूती मिळाल्याचा आनंद अवर्णनीय असल्याचे भक्त सांगतात.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

