कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑हुमरस तिठा येथील पिकअप शेडचे नुकसान; सहा महिने उलटूनही दुरुस्ती नाही.

*🛑हुमरस तिठा येथील पिकअप शेडचे नुकसान; सहा महिने उलटूनही दुरुस्ती नाही.*

 

*🛑सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांचे निवेदन;१५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* हुमरस तिठा येथील माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पिकअप शेडला ट्रक चालकाने धडक देऊन नुकसान केल्याची घटना श्रावण महिन्यात घडली होती. मात्र सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) कोणतीही दुरुस्ती अथवा कारवाई करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विभागाला निवेदन सादर केले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या श्रावण महिन्यात एका ट्रक चालकाने गाडी मागे घेत असताना हुमरस तिठा येथील पिकअप शेडला धडक दिली. या धडकेत शेडचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करून फोटो काढून गेले.

यावेळी संबंधित ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पकडून ठेवले होते. नंतर पोलिसांना कळविल्यानंतर वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले आणि चालकाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र शासकीय मालमत्तेच्या नुकसानीबाबत कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही पिकअप शेडची दुरुस्ती किंवा नवीन शेड उभारण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत धोकादायक झालेली शेड तात्काळ हटवून नवीन शेड उभारण्याची मागणी केली आहे.

येत्या १५ दिवसांत या प्रकरणात योग्य ती कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर अनूप दयानंद नाईले, होरेस्ट विनायक पोंडकरी, संदेश सत्यवान रेडकर आणि सिद्धेश दिनानाथ नाईक यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!