🛑श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या पायाभूत अभ्यासक्रम विभागाचे प्रा. महेंद्र ठाकूर सेवानिवृत्त.
*🛑श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या पायाभूत अभ्यासक्रम विभागाचे प्रा. महेंद्र ठाकूर सेवानिवृत्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी च्या फाउंडेशन कोर्स तथा पायाभूत अभ्यासक्रमाचे प्रा. महेंद्र ठाकूर हे आपल्या नियत वयोमानानुसार 37वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत ,सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे माजी विभाग प्रमुख व स. का. पाटील महाविद्यालय मालवणचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस ए ठाकूर,सौ.सुखदा ठाकुर, महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. दिलीप गोडकर, सौ नेहा ठाकूर, डॉ.चिन्मयी ठाकूर महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनै उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले . प्रा.ठाकुर हे सकारात्मक विचार असलेले सतत उत्साही व आपल्याला सतत कामात व्यस्त ठेवणारे प्राध्यापक आहेत असे गौरवोद्गार काढले. संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत व सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत यांच्या हस्ते प्रा. महेंद्र ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौ नेहा ठाकूर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. महेंद्र ठाकूर यांनी महाविद्यालयामध्ये 37 वर्ष फाउंडेशन कोर्स तथा पायाभूत अभ्यासक्रम या विषयांमध्ये सेवा बजावली त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणूनही महाविद्यालयात काम केले. महाविद्यालयातील सेवेबरोबरच त्यांनी आपली वृक्षारोपणाची आवड जोपासत एक लाखापेक्षा जास्त झाडांची लागवड केली व अनेक लोकांना त्यांनी काजू, आंबा ,नारळ, सुपारी अशा विविध झाडांच्या लागवडीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या निवृत्ति निमित्ताच्या कार्यक्रमांमध्ये प्रा. डॉ. बी एन हिरामणी ,प्रा. डाॅ.सौ. प्रगती नाईक, प्रा. डॉ. एस ए देशमुख, प्रा. डॉ. एस एम बुवा, प्रा. डॉ.सौ. नीलम धुरी, प्रा. एम बी बर्गे ,प्राचार्य डॉ.एस.ए. ठाकूर यांनी आपली मनोगते व्यक्त केली .प्रा. महेंद्र ठाकूर यांचे विद्यार्थी कुणाल वरस्कर व शरद पेडणेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रा. ठाकूर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपण उद्योग धंद्यामध्ये यशस्वी झालो. आपल्या गुरुंनी केलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला व कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत यांनी प्रा.ठाकुर यांनी महावीद्यालयासाठी आजपर्यंत उत्तम काम केले व निवृत्तीनंतरही त्यांनी काॅलजसाठी काम करावे अशी इच्छा व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभाला उत्तर देताना प्रा. महेंद्र ठाकूर यांनी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी महाविद्यालयामध्ये अध्यापनासाठी दिलेली संधी व एकंदरीत केलेली मदत याबद्दल राजघराण्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली व आयुष्यभर आपण त्यांच्या ऋणात राहू अशी भावना व्यक्त केली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंंसले यांनी काम करण्यास सतत प्रोत्साहित केले व विश्वास दाखवला याबद्दल त्यांचे आभार मानले व ऋण व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी केले व आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

