जिल्ह्यात कोरोनास्थिती नियंत्रणात – पालकमंत्री उदय सामंत

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : सुनिल आचरेकर

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. २७ राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता योग्य ती काळजी घ्यावी असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि.प. अध्यक्षा श्रीमती समिधा नाईक, जि.प. आरोग्य सभापती श्रीमती सावी लोके, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत आदीं उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.5 असून, तर मृत्यू दर 2.7 टक्के इतका आहे. आतापर्यंत सुमारे 65 हजार 839 इतक्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठी उपलब्ध असून, आगामी 10 दिवसात आरोग्य विभागाने किमान 5 हजार कोरोना टेस्ट कराव्यात. तसेच स्वॅब टेस्ट प्रलंबित राहू नयेत याची दक्षता घ्यावी, असे सांगून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्तीसाठी अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. जिल्ह्यात सुमारे 93 टक्के पोलिसांचे लसीकरण झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. तर जिल्ह्यात एकूण 10 हजार 285 लोकांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री उदय सांमत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ज्या व्यापाऱ्यांना अथवा उद्योजकांना वीजबिल भरण्यासंदर्भात हप्ते पाडून दिले गेले असतील आणि अशांनी वीजेचा पहिला हप्ता भरला असेल अशांचे वीज तोडणी करु नये. त्याचबरोबर महावितरणने वीजबिलाची योग्य ती शहानिशा करावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!