कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आठवी राष्ट्रीय परिषद संपन्न : औषध संशोधनाचा नवा अध्याय….

*🛑भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आठवी राष्ट्रीय परिषद संपन्न : औषध संशोधनाचा नवा अध्याय….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “औषध शोध आणि विकासातील प्रगत तंत्रज्ञान” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेस महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातसह विविध राज्यांतून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ६० पेक्षा अधिक शोधनिबंधपर भित्तीपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी औषधनिर्माणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी डॉ. सुनीलकुमार बोथरा, प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी यांनी संशोधन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ.तितीक्ष देवळे, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, गोवा यांनी एआय आणि मशीन लर्निंगमुळे औषध शोध प्रक्रियेत होत असलेल्या क्रांतिकारी बदलांवर मार्गदर्शन केले. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अमोघ दांडेकर यांनी औषधनिर्मितीतील सुरक्षा व नियामक अनुरूपतेबाबत माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शोधनिबंधपर भित्तीपत्रक स्पर्धा पार पडली. पदवी विभागात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या काजल आडणेकर हिने प्रथम, लोहित तावडे याने द्वितीय तर ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी, खेड येथील सानिका मोरे आणि सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तोंडवली येथील विश्रुती विचारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. पदविका विभागात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या मृण्मयी सावंत हिने प्रथम व मासिरा नदाफ हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

पदव्युत्तर व विद्यावाचस्पती विभागात भारती विद्यापीठ, कोल्हापूरच्या जिज्ञासा पंतवालावलकर हिने प्रथम, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रमदा नाईक हिने द्वितीय व डी.वाय.पाटील फार्मसी कॉलेज आकुर्डीच्या कांचन नाईक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना प्रमाणपत्र व विजयचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. तुषार रुकारी यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!