कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑घोटगे ग्रामपंचायतीची राज्यात हरित झेप ; ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये २५ लाखांचे पारितोषिक.

*🛑घोटगे ग्रामपंचायतीची राज्यात हरित झेप ; ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये २५ लाखांचे पारितोषिक.*

 

*🛑वरळी येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान,भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २४:-* पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण करत दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर आपली वेगळी छाप पाडली आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीला तब्बल २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून वरळी, मुंबई येथे झालेल्या समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते घोटगे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींपैकी घोटगेची निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 

*हरित गाव संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी*

 

घोटगे ग्रामपंचायतीने ‘हरित गाव’ ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवली. वृक्षलागवड मोहिमा, प्लास्टिकमुक्त गाव अभियान, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, तसेच नियमित स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम सातत्याने राबवण्यात आले.

विशेष म्हणजे या सर्व उपक्रमांत ग्रामस्थ, महिला बचतगट, युवक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहिला. सामूहिक प्रयत्नांमुळे पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श मॉडेल उभा राहिला आहे.

 

*हा सन्मान संपूर्ण गावाचा ; सरपंच भक्ती दळवी*

 

सरपंच भक्ती भरत दळवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा पुरस्कार केवळ ग्रामपंचायतीचा नसून संपूर्ण घोटगे गावकऱ्यांच्या एकजुटीचा आणि परिश्रमांचा सन्मान आहे.” मिळालेला २५ लाखांचा निधी पुढील हरित उपक्रम, पाणी व्यवस्थापन सुधारणा आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

*भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव*

 

या उल्लेखनीय यशानंतर भाजपा पदाधिकारी तसेच नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी घोटगे ग्रामपंचायतीला भेट देत अभिनंदन केले. यावेळी तालुकाध्यक्ष तथा माटणे जि. प. सदस्य दीपक गवस, साटेली-भेडशी जि. प. सदस्य श्वेता धर्णे, प. स. सदस्य संजय सातार्डेकर, उपतालुकाध्यक्ष आनंद तळणकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सुनिल गवस, सूर्यकांत धर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यासाठी प्रेरणादायी आदर्श

घोटगे ग्रामपंचायतीच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पर्यावरणपूरक विकास, लोकसहभाग आणि शाश्वत नियोजन यांचा संगम साधत घोटगेने इतर गावांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!