🛑यात्रोत्सवातून कुडाळ आगाराला साडेसहा लाखाचे उत्पन्न.
*🛑यात्रोत्सवातून कुडाळ आगाराला साडेसहा लाखाचे उत्पन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २१:-* कुडाळ आगारातून एसटी आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या यात्रोत्सवासाठी व नेरुर येथील श्री देव कलेश्वर महाशिवरात्रोत्सवासाठी दरवर्षी जादा वाहतूक केली जाते. यातून आगाराला चांगले उत्पन्न मिळते. कुडाळ आगाराकडून आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी दोन दिवसांचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी २०२ फेऱ्यांची जादा वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीचा १२,६७६ प्रवाशांनी लाभ घेतला. जादा वाहतुकीमधून सर्व सवलतींसह कुडाळ आगाराला ६ लाख ३५ हजार ११८ रु. उत्पन्न मिळाले, तर नेरुर येथील श्री देव कलेश्वर महाशिवरात्रोत्सवासाठी ६४ फेऱ्यांची वाहतूक करून ४४४ किमी. प्रवासातून ३३ हजार ७८६ रु. उत्पन्न सवलत मूल्यासह मिळाले. या वाहतुकीचा २,९५३ प्रवाशांनी लाभ घेतला,अशी माहिती कुडाळ आगारप्रमुख रोहित नाईक यांनी दिली. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सवासाठी व नेरुर येथील श्री देव कलेश्वर महाशिवरात्रोत्सवाला कुडाळ आगारातून दरवर्षी जादा वाहतूक केली जाते. आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या यात्रोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच हा यात्रोत्सव दोन दिवस असतो. त्यामुळे भाविकांची अलोट गर्दी असते. बाहेरुन येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा मिळावी, म्हणून कुडाळ एसटी आगारातून दरवर्षी जादा वाहतूक केली जाते. तसेच नेरुर महाशिवरात्रोत्सवासाठीही एसटी प्रशासनाकडून जादा वाहतूक केली जाते.मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांना एसटी प्रशासनाकडून चांगली सेवा दिली जाते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

