🛑स्व. दिनकर धारणकरांची नाट्यक्रांती घराघरात पोहोचवणार; पुढील वर्षीचा ‘क्षितिज नाट्यमहोत्सव’ भव्यदिव्य – विशाल परब
*🛑स्व. दिनकर धारणकरांची नाट्यक्रांती घराघरात पोहोचवणार; पुढील वर्षीचा ‘क्षितिज नाट्यमहोत्सव’ भव्यदिव्य – विशाल परब*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उत्साहात उद्घाटन भाजपा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. नाट्यरसिकांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात.नाट्यचळवळीबाबत नव्या उमेदीचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विशाल परब म्हणाले की, आज सोशल मिडिया, मालिका आणि वेबसिरीजच्या जमान्यातही नाट्यचळवळ जिवंत ठेवणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. बालनाट्याच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य होत असून, ही परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी योग्य मार्केटिंग व नियोजनाची गरज आहे.
“स्व. दिनकर धारणकर सरांनी पेटवलेली नाट्यक्रांती घराघरात पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. पुढील वर्षीचा ‘क्षितिज नाट्यमहोत्सव’ अधिक भव्यदिव्य आणि व्यापक स्वरूपात साजरा करू. माझे सक्रिय सहकार्य दरवर्षी राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमास क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, स्व. धारणकर सरांचे सुपुत्र हर्षवर्धन धारणकर, चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मण नाईक, पत्रकार ॲड. संतोष सावंत, नगरसेवक तथा रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. निलम नाईक, सौ. सुनिता पेडणेकर, पत्रकार विनायक गावस, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, सत्यजीत धारणकर, गुरु चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. दिनकर धारणकर यांच्या स्मृतीला अभिवादन करत बालकलाकारांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावंतवाडीत नाट्यचळवळीला नवी ऊर्जा देणारा हा महोत्सव ठरत असून, पुढील वर्षी तो अधिक व्यापक पातळीवर नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

