🛑एसटीच्या सवलतधारकांसाठी आता ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य.
*🛑एसटीच्या सवलतधारकांसाठी आता ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २०:-* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.यात शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाणार आहे.अमृत ज्येष्ठ नागरिक,सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड देण्यात येणार आहे.दिव्यांग प्रवाशांना क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे.पुरस्कारार्थी व पत्रकार,स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत वितरण केले जाणार आहे. नवीन कार्ड १९९ रुपये (GST men) जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. किमान १०० रुपये असून ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.एटीएम मशीन,अधिकृत संकेतस्थळ,मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज करता येते. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ,सुरक्षित आणि पारदर्शक होणार असून याचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

