🛑स्वराज्य अवतरले…! सावंतवाडीत शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष.
*🛑स्वराज्य अवतरले…! सावंतवाडीत शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी शहरात आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला शिवभक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. विशेषतः युवकांची उत्स्फूर्त उपस्थिती हे या रॅलीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
या शिवजन्मोत्सव रॅलीमध्ये भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, प्रतीक बांदेकर, नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर, सौ. दिपाली भालेकर, सौ. सुकन्या टोपले, भाजपा सोशल मीडिया प्रमुख श्री केतन आजगावकर, दिलीप भालेकर तसेच स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीदरम्यान शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना युवा नेते विशाल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणे ही आजच्या तरुणाईची जबाबदारी असल्याचे सांगितले. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले हजारो-लाखो शिवभक्त हीच महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वराज्य संघटनेच्या वतीने हा शिवजन्मोत्सव कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला. शहरातील विविध भागातून शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

