कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचा रांगोळीतून अविष्कार.

*🛑शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचा रांगोळीतून अविष्कार.*

 

*🛑कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेच्या सभागृहात ४ फुट बाय ३० फुटी भव्य रांगोळी साकार!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून घुमणारा ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा उत्साह!याच मंगलमयी निमित्ताने सावंतवाडीतील प्रतिष्ठित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एका अभूतपूर्व कलाविष्काराचे दर्शन घडले. प्रशालेतील कलाशिक्षक श्री. केदार टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी चक्क ४ फूट बाय ३० फूट अशा विस्तीर्ण आकारात शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित महाकाय रांगोळी साकारली आहे.

ही केवळ रांगोळी नसून स्वराज्य शौर्याच्या धगधगत्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज ठरली आहे. यामध्ये शिवजन्मोत्सव, स्वातंत्र्याचे पहिले पाऊल, रायरेश्वराची शपथ, भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम असे प्रसंग अत्यंत नयनरम्य पद्धतीने चितारण्यात आले आहेत. ‘स्वराज्याचे युगपुरुष’,’मराठी अस्मितेचा विजय’,’भारतीय आरमाराचे जनक’ आणि ‘हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय’ अशा विविध संकल्पनांतून शिवरायांचे जाज्वल्य जीवन या कलाकृतीतून उलगडले आहे.

कला शिक्षक श्री. केदार टेमकर यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली कु.वेणू अजित सावंत, कु.गौरी धर्यशील शिर्के, कु.दूर्वा संतोष दाभोलकर, कु.श्रीयोग नितीन कारेकर,कु. हिराली सुबोध वराडकर आणि कु.अथर्व संजय शेडगे या चिमुकल्या हातांनी आपल्या कल्पकतेतून हा शिवप्रताप रंगांतून जिवंत केला.

या सर्व विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक श्री केदार टेमकर यांचे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शैलेशजी पई,

सचिव श्री प्रसाद नार्वेकर तसेच संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शिक्षण प्रेमींकडून भरभरून कौतुक होत आहे.

सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ही भव्य रांगोळी पुढील आठ दिवस प्रशालेच्या सभागृहात प्रदर्शनासाठी खुली राहणार आहे. तरी सर्व हितचिंतक, माजी विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी या कलाविष्काराचा आनंद घ्यावा,असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत भुरे व पर्यवेक्षक श्री सुबोध वराडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!