कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नोटांचा वर्षाव… पण देवाला वेठीस?”

*🛑नोटांचा वर्षाव… पण देवाला वेठीस?”*

 

*🛑”कोलगाव मतदारसंघात पैशांच्या पावसावर ‘उपरलकर’ची छाया; मतदारांनी पाकिटे ठेवली देवाच्या चरणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कोलगाव,माडखोल, इन्सुली-तळवडे या भागात पैशांचा अक्षरशः ‘धो-धो पाऊस’ पडल्याची चर्चा रंगली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या; मात्र सर्वाधिक गाजला तो कोलगाव मतदारसंघ. येथे अनेक मतदारांनी या “नोटांच्या पावसात” मनसोक्त अंघोळ केली,अशी बोचरी टीका गावागावात ऐकू येत आहे.

परंतु या कथेला अनपेक्षित वळण मिळाले तेव्हा काही मतदारांनी घेतलेली पैशांची पाकिटे थेट श्री देव उपरलकर देवस्थान येथे आणून ठेवली. ३६५ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवतेच्या चरणी ही पाकिटे अर्पण करण्यात आली. तेथील मानकरी शितप यांनी ती पाकिटे फोडून रक्कम दानपेटीत जमा केली, तर आत असलेला देवाचा फोटो व अंगारा विधीपूर्वक चरणी ठेवला.

*“देवाचा फोटो आणि अंगारा” – मतदारांमध्ये भीती?*

या पाकिटांमध्ये रोख रकमेसोबत देवाचा फोटो आणि अंगारा ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळेच काही मतदार दचकल्याची चर्चा आहे. “खोटं कर्म करतानाही देवाला साक्षी ठेवायचं?” असा सवाल गावकुसात उपस्थित होतो आहे.

एका महिलेच्या बाबतीत घडलेला प्रसंग विशेष चर्चेत आहे. तिच्या हाती दिलेलं पाकीट तिने उघडले असता पैशांसोबत देवाचा फोटो व अंगारा बाहेर आला. धार्मिक भावनेतून ती घाबरली; आपण चुकीचं केलं का, या विचाराने ती व्यथित झाली, अशी चर्चा स्थानिक पातळीवर रंगली. या घटनेनंतर काही मतदारांनीही आपापली पाकिटे परत केल्याचे सांगितले जाते.

*समाजाला प्रश्न*

निवडणुकीत पैसा वापरणे ही बाब नवी नाही; पण मतांच्या बदल्यात नोटा देताना देवतांचा आधार घेणे, श्रद्धेला वेठीस धरणे — हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.

मतदारांच्या मनात भीती निर्माण करून मतं वळवण्याचा हा प्रयत्न होता का? की धार्मिक भावनांचा वापर करून “पाप पचवण्याचा” प्रयत्न?

कोलगावमध्ये सध्या याच प्रश्नांची खुमासदार चर्चा रंगली आहे.

लोकशाही ही पैशांच्या पावसावर नव्हे, तर जागरूक मतदारांच्या निर्णयावर उभी असते. देवाला साक्षी ठेवून मतं मागणाऱ्यांना आणि नोटांच्या पावसात भिजणाऱ्यांनाही आता आत्मपरीक्षणाची गरज आहे.

लोकशाही विक्रीसाठी नाही… आणि श्रद्धा तर अजिबात नाही!

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!