🛑मठ हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती.
*🛑मठ हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १७:-* मठ येथील राय. डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूलचा हिस्ट्री क्लब, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मठ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत मठ ते शिवाजी चौक मठ असे शिव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच, मठ हायस्कूल येथील राय. मधुसूदन खानोलकर सभागृह येथे वेशभूषा स्पर्धा, विद्यार्थी गौरव व विद्यार्थ्यांचे मनोगत कथन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मठ सरपंच रुपाली अजित नाईक भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणप्रेमी प्रकाश मंगेश मठकर, निवृत्त प्राचार्य शिवराम अनंत्, ठाकुर, काजू उद्योजक दीपक ठाकुर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये माजी सरपंच तुळशीदास ठाकुर, माजी उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य नित्यानंद शेणई, कार्यकर्ते मिलिंद खानोलकर, प्रेरणा महिला ग्रामसंघाच्या प्रमुख वैभवी पोतदार, सहकारी सोसायटी चेअरमन सुभाष ठाकुर, पत्रकार व माजी विद्यार्थी अजय गडेकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खानोलकर, केंद्रशाळा मठ क्र. १ चे मुख्याध्यापक अजित तांबे, शाळा मठ क्र. २ च्या मुख्याध्यापिका ऋतिका राऊळ, शाळा मठ क्र. ३ चे मुख्याध्यापक वीरधवल परब आणि मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निलम गावडे, उपाध्यक्षा संजना तेंडोलकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष केशव ठाकुर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लेझीम, लाठीकाठी, पोवाडा गायन याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गावमर्यादित वेशभूषा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि दीप प्रज्वलीत करून छत्रपतींना आगळावेगळा मुजरा करावा, असे आवाहन समस्त नागरिकांना करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

