◾ भुईबावडा येथील आठवडा बाजारात नुतन सरपंच बाजीराव मोरे यांनी आपल्या स्वखर्चातून केले मास्क चे वाटप
◾ विना मास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा
🖥️ Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:वैभववाडी
🎴वैभववाडी, दि,२६:- राज्यात आठवडाभरापासून पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून कोरोनारुपी संकटाला तोंड देण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भुईबावडा येथील आठवडा बाजारात नुतन सरपंच बाजीराव मोरे यांनी आपल्या स्वखर्चातून मास्कचे वाटप केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत त्यांचे कौतुक होत आहे. तसेच विना मास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भुईबावडा येथील आठवडा बाजारात नवनिर्वाचित सरपंच बाजीराव मोरे यांनी बाजारात येणाऱ्या विनामास्क ग्राहकांवर कारवाई नं करता त्यांना आपल्या स्वखर्चातून मोफत मास्कचे वाटप केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच विना मास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी मास्कचे वाटप करताना सरपंच बाजीराव मोरे, उपसरपंच स्वप्नाली देसाई, श्रेया मोरे, वैशाली शिंदे, कल्याणी देसाई, माजी उपसरपंच रमेश मोरे, तानाजी मोरे, मनोहर मोरे, प्रकाश मोरे, सुर्यकांत मोरे, मंगेश मोरे, दिपक पांचाळ, संतोष पाटणे, रविंद्र मोरे, सुरेश मोरे, रमेश मोरे, ग्रा. पं. शिपाई सदानंद देसाई यांच्यासह भुईबावडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.