🛑सुसाट अवजड वाहतुकीमुळे नेमळे हायस्कूलसमोरील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; गतिरोधकांसाठी पालकांचा संतप्त इशारा.
*🛑सुसाट अवजड वाहतुकीमुळे नेमळे हायस्कूलसमोरील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; गतिरोधकांसाठी पालकांचा संतप्त इशारा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नेमळे, दि- १३:-* नेमळे पोकळे नगर येथील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या समोरील वेंगुर्ला – बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या सुसाट व भरधाव अवजड वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. शाळा भरतेवेळी आणि सुटतेवेळी रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असताना दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहने वेगमर्यादा न पाळता धावतात, अशी तक्रार पालकवर्गातून करण्यात आली आहे.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच महामार्ग असल्याने विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो.विशेषतः सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत वाहनचालक मागेपुढे न पाहता वेगाने वाहने चालवत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नेमळे ग्रामपंचायत तसेच शिक्षण संस्थेकडून संबंधित विभागाकडे वारंवार निवेदने देऊन शाळेसमोर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसविणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक व ‘शालेय परिसर’ सूचना फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या या दुर्लक्षाविरोधात पालकवर्ग संतप्त झाला असून, शाळा सुरू असताना किंवा सुटतेवेळी एखादा जीवघेणा अपघात झाल्यास संबंधित विभागावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तातडीने प्रतिबंधात्मक उपाय करावेत,” अशी ठाम मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन शाळेसमोरील महामार्गावर आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

