कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी : इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा क्षण; नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना पुत्ररत्न प्राप्त

सावंतवाडी : इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा क्षण; नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना पुत्ररत्न प्राप्त

सावंतवाडी –
सावंतवाडी संस्थानला सुमारे ४०० वर्षांचा समृद्ध आणि गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या परंपरेत नवा सुवर्ण अध्याय जोडत, संस्थानच्या १९ व्या पिढीतील सुनबाई युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी थेट जनतेतून निवडून येत सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला.
विशेष म्हणजे, पोटात बाळ असतानाच त्यांनी ही निवडणूक लढवली आणि आत्मविश्वास, जनतेचा विश्वास व नेतृत्वगुणांच्या बळावर घवघवीत विजय मिळवला. हा क्षण स्वतःमध्येच प्रेरणादायी ठरला होता.
आज त्या आनंदात भर घालत, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. सावंतवाडीच्या इतिहासात नगराध्यक्षपदावर कार्यरत असतानाच मातृत्व लाभण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने, हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आणि दुसरीकडे मातृत्वाचा आनंद — या दोन्ही भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हा क्षण केवळ एका कुटुंबाचा आनंद नसून, सावंतवाडीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातील एक ऐतिहासिक पर्व ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!