◼️महावितरणने विज बिल वसुलीसाठी कंबर कसली
◼️विज कनेक्शन तोडले;मात्र बड्या अधिकाऱ्यांशी संपर्क करताच ताबडतोब जोडले
🖥️Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि,२५:- सध्या महावितरणने विज बिल वसुली साठी आपली कंबर कसली आहे.मात्र दोडामार्ग तालुक्यातील माटणे गावात विज बिल वसुली साठी गेले असता विज बिल वसुली न झाल्यामुळे विज कनेक्शन तोडण्याचा प्रकार घडला आहे.
पालकमंत्र्यांनी विज बिल वसुली साठी योग्य निर्णय देऊन देखील विज कनेक्शन तोडण्यात आले. मात्र ज्यांचे विज कनेक्शन तोडण्यात आले अशा ग्राहकांनी महावितरणच्या बड्या अधिकाऱ्यांशी बोलुन त्यानंतर त्यांचे तोडलेले विज कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. पालकमंत्र्यांनी कोणाचेही विज कनेक्शन तोडू नको असे आदेश देऊन देखील विज कनेक्शन तोडण्यात आल्यामुळे नागरिकांमधून महावितरणा विषयी नाराजी व्यक्त होत आहे.

