कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आरोंदा जि. प. मतदारसंघात कवठणकरांचा झंझावात

आरोंदा जि. प. मतदारसंघात कवठणकरांचा झंझावात;

सातार्ड्यातून प्रचाराचा दणदणीत शुभारंभ

सातार्डा |
आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक रणधुमाळीला आता वेग आला असून शिवसेना–भाजप युतीचे अधिकृत उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सातार्डा येथून सुरू केला आहे. ग्रामदैवत श्री देव रवळनाथ चरणी श्रीफळ वाढवून विजयाचा कौल मागत कवठणकरांनी प्रचाराचा श्रीगणेश केला.
या प्रसंगी सातार्डा परिसरात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती. उपस्थिती आणि उत्साह पाहता आरोंदा मतदारसंघात परिवर्तनाची लाट आकार घेत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुदन कवठणकर यांनी संयमी पण ठाम भूमिका मांडली.“मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. विकास हेच माझे बोलणे आणि काम असेल,” असे स्पष्ट करत त्यांनी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांना थारा न देण्याची भूमिका घेतली.
“निवडणुकीनंतर माझे कामच बोलेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील रस्ते, आरोग्य सुविधा आणि युवकांचा रोजगार हेच आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच बंडखोरी, अफवा आणि धनशक्तीच्या राजकारणापासून सावध राहण्याचे आवाहन करत, आरोंदा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ती अशा प्रवृत्तींना योग्य धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी पंचायत समितीचे उमेदवार शेखर मांजरेकर, सातार्डा सरपंच संदीप प्रभू, कवठणीचे माजी सरपंच सुमन कवठणकर, तसेच संतोष गोवेकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धू केरकर, रामदास सातार्डेकर, किरण प्रभू यांच्यासह शिवसेना–भाजप युतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आरोंदा मतदारसंघात प्रचाराची लढाई आता स्पष्टपणे रंगात आली असून सुदन कवठणकर यांचा वाढता जनसंपर्क विरोधकांची चिंता वाढवणारा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!