कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

राणेंचा निष्ठावंत कार्यकर्ता रडला अन् आमदार निलेश राणे यांचे पाय निरवडे कडे वळले

*राणेंचा निष्ठावंत कार्यकर्ता रडला अन् आमदार निलेश राणे यांचे पाय निरवडे कडे वळले*

*आमदार निलेश राणे यांच्या भेटीने प्रमोद गावडे यांच्या भुमिकेकडे लक्ष*

सावंतवाडी | शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे यांनी निरवडे येथील राणेसमर्थक खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची भेट घेतल्यानंतर तळवडे
मतदारसंघातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीकडून स्थानिक उमेदवार न दिल्याने नाराज झालेले प्रमोद गावडे तळवडे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पक्षाने डावलल्याची भावना मनात ठेवून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. यावेळी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांना अश्रू अनावर झाले होते. “काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राजकारणात संधीच नाही का?” हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला.प्रमोद गावडे हे कट्टर राणेसमर्थक असून गेली तीन दशके ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत निष्ठेने कार्यरत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने त्यांची नाराजी उघड होती. अशा पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी स्वतः गावडेंची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या भेटीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.अश्रू, नाराजी आणि आता थेट राणेंची भेट—या घडामोडींमुळे तळवडे मतदारसंघात नेमकं राजकीय बळ कुणाच्या पारड्यात जाणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!