माजगाव जिल्हापरिषद मध्ये विक्रांत सावंत यांचा एकतर्फी विजय निश्चित*
*माजगाव जिल्हापरिषद मध्ये विक्रांत सावंत यांचा एकतर्फी विजय निश्चित*
*धनशक्ती येईल-जाईल… पण माजगावचा विश्वास अढळ आहे!”*
*“खजिना कितीही मोठा असो, माजगावचे मन विकत घेता येत नाही!”*
सावंतवाडी –
आरोग्य मंत्री कै भाई साहेब सावंत यांचा वारसा लाभलेला माजगाव मतदार संघ हा विचारवंतांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघाला नव्हे तर जिल्ह्याला भाईसाहेब सावंत आरोग्य मंत्री असताना खूप काही देऊन गेले जिल्ह्यात आज जी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र दिसतात ती कै भाईसाहेब सावंत यांची कृपा. एक अभ्यासू व्यापक नेतृत्व म्हणून भाईसाहेब सावंत यांच्याकडे पाहिले जात होते ,त्यांच्या अकाली मृत्यूनंतर ती जबाबदारी त्यांचे पुत्र कैलासवासी विकास भाई सावंत यांनी समर्थपणे पार पडली .मीतभाषी,सौजन्य शिलता प्रेमाने माणसे जिंकण्याची कला त्यांच्याकडे असल्याने त्यांचा मित्र समुदाय ही मोठा व विचारवंत होता.राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष पद त्त्याने अनेक वर्ष यशस्वीपणे सांभाळून कॉलेज व शाळेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली व कॉलेजच्या शाळेची टुमकदर इमारत उभी करून मुलांसाठी क्रीडांगणाची सोय केली दूरदृष्टी असलेली नेते, नेतृत्व म्हणून विकास भाई यांच्याकडे पाहिले जात होते.जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती म्हणून त्यांनी यशस्वी कार्तिकद केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पुत्र विक्रांत सावंत यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी समाजकारणात प्रवेश केला, मराठा क्रांती मोर्चाचे सावंतवाडी तालुक्याचे यशस्वी नियोजन करून सावंतवाडी तालुक्यातील जवळपास दहा हजार मराठा बांधव संघटित करून ओरोस येथे नेले याच कालावधीत त्यांच्यातील नेतृत्व गुण सर्वांना दिसून आला.
त्यानंतर ते शिवसेनेचे विधानसभा प्रमुख झाले ,आक्रमक तेवढेच विचार देणारे भाषण भाषणावर पकड व जे काही मांडायचे ते मुद्देसूद, त्यांचे नेतृत्व सर्वांनाच भावले सर्वांना व युवाशक्तीला बरोबर घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले,अलीकडेच त्यांच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी आली ती जबाबदारी यशस्वीपणे पार पडत असताना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना जिल्हा परिषदेसाठी माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून उभे करण्याचे निश्चित केले.भाजप पक्षप्रवेश झाला व ठरल्याप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली. विक्रांत सावंत यांच्या उमेदवारीने अख्खे माजगाव एकत्र झाले ,भावकी व गावकी एकत्र असल्याचे चित्र महादेव मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवताना दिसून आले. माजगावने भाईसाहेब सावंत कुटुंबावर मनापासून प्रेम केले व हेच प्रेम विक्रांत सावंत यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.
असाच एक कसोटीचा दहा वर्षापूर्वी विक्रांत सावंत यांच्यावर आला होता ,माजगाव ग्रामपंचायतचे नेतृत्व करत असताना राजकीय टिका टिपणी करून विक्रांत सावंत पिक्चरच्या ऍक्टर प्रमाणे दिसतात त्यांनी एक्टिंग करावी अशी टीका विरोधकांनी केली ही टीका माजगाव वासियांच्या जिव्हारी लागली त्यांनी एक हाती विक्रांता सावंत यांच्या नेतृत्वाखाली माजगावची ग्रामपंचायत सत्ता शिवसेनेकडे दिली.हे विक्रात सावंत यांचे पहिले राजकीय यश. ती वेळ आता पुन्हा एकदा आली आहे ,काही गुप्त शत्रू विक्रांत सावंत यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र धनशक्तीपुढे जनशक्ती झूकणार नाही असे चित्र सध्या माजगाव मध्ये आहे .आणि या चित्रातून माजगाव मधून विक्रांत सावंत एकतर्फी निवडणूक जिंकतील असा जाणकारांचा अंदाज आहे.
तुम्ही कितीही कुबेराचा खजिना घेऊन माजगाव मध्ये उतरला तरी तेथील सुज्ञ जनता अशा क्षणिक सुखाच्या आमिषाला बळी पडणार नाही व आपले मत रुपी आशीर्वाद विक्रांत सावंत याला देतील असा विश्वास आहे या जिल्हा परिषदेच्या निमित्ताने विक्रांत सावंत यांचे नेतृत्व पुन्हा एकदा ऊभरणार आहे किंवा या युवा नेतृत्वाला भविष्यात अनेक संधी मिळू शकतात त्यामुळे या नेतृत्वाच्या पाठीशी माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व गावे राहतील असा विश्वास आहे, माजगाव चराटे ओटवणे, वेत्ये या गावांमध्ये विक्रांत सावंत यांनी प्रचारात मोठे आघाडी घेतली आहे ,त्यांच्या समोर विरोधकांची ताकद नगण्य असली तरी पैशाचा पाऊस पाडला जाणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. हा पैसा कोण पुरविणार ?कुठून येणार ?याचा शोध निश्चितच नंतर लागेल मात्र माजगाव वासीय यांनी गाफील न राहता कैलासवासी भाईसाहेब सावंत व कैलासवासी विकास सावंत यांच्या विचाराची परंपरा पुढे नेण्यासाठी विक्रांत सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे एवढीच अपेक्षा आहे.
!

