🛑रेशनकार्डसाठी पैसे नाहीत तर पेजेचा तांदूळ, काजूगर, तूप, पपई आणि बकरीचे दूध आणा!
*🛑रेशनकार्डसाठी पैसे नाहीत तर पेजेचा तांदूळ, काजूगर, तूप, पपई आणि बकरीचे दूध आणा!*
*🛑सावंतवाडी तहसीलमधील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यावर गंभीर आरोप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* सावंतवाडी तहसील कार्यालयात गरीब,भटक्या समाजातील महिलेकडून नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी थेट लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती दीपाली सचितानंद गोटे / वाघमारे यांनी रेशनकार्डसाठी तब्बल १० हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप अर्जदार महिलेने लेखी तक्रारीतून केला आहे.
ही तक्रार आंबोली येथील धनगर (भटक्या) समाजातील शालू जानू कोकरे (भेकर) यांनी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे दिली आहे.
अर्जदार शालू कोकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्या काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तहसील कार्यालयात नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी गेल्या असता, संबंधित पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी “१० हजार रुपये दिल्यास एका दिवसात रेशनकार्ड मिळेल” असे स्पष्ट सांगितले.
आपली अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती सांगितल्यानंतर, रोख रक्कम नसेल तर पेजेचा तांदूळ, चुलीवर भाजलेले काजूगर, साजूक तूप,गोड पपई आणि बकरीचे दूध आणून दे अशी अजब व संतापजनक मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे, तर हे साहित्य कार्यालयात न आणता बाजूच्या कँटीनमध्ये ठेव,बकरीचे दूध फ्रिजमध्ये ठेव आणि “माझं नाव सांगितलंस की कोणी काही विचारणार नाही” असे सांगून कोणतेही कागदपत्र नसतानाही एका तासात रेशनकार्ड काढून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यावर, “एवढेही देऊ शकत नसशील तर इथून चालती हो, माझा वेळ वाया घालवू नकोस” असे शब्द वापरून अपमानास्पद वागणूक देत महिलेला कार्यालयाबाहेर हाकलून दिल्याचा गंभीर आरोप आहे.
भटक्या समाजातील, मजुरीवर पोट भरणाऱ्या गरीब महिलेसोबत घडलेला हा प्रकार प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर आणि भ्रष्टाचारविरोधी घोषणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी अर्जदार शालू कोकरे यांनी केली आहे.
आता या प्रकरणावर पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

