🛑राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुतारवाडी बायपास रस्त्याची भीषण दुरावस्था.
*🛑राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुतारवाडी बायपास रस्त्याची भीषण दुरावस्था.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* झाराप–पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावरील मळगाव बॉक्सवेलकडून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्यालगत असलेल्या सुतारवाडी बायपास रस्त्याची दुरावस्था राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. या संदर्भात मागील ऑगस्ट महिन्यात वृत्त प्रसिद्ध करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्य महामार्गाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी या बायपास रस्त्याकडे पाहण्याची साधी तसदीही संबंधित विभागाने घेलेली नाही. परिणामी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून त्याचा नाहक त्रास येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
झाराप–पत्रादेवी मार्गावर मळगाव बॉक्सवेल परिसरातून कुडाळकडे जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्याला लागूनच हा बायपास रस्ता आहे. मुख्य महामार्गाचा वापर अधिक सोयीचा व्हावा, यासाठी बायपास रस्ता करण्यात येणार असल्याचे आश्वासन पूर्वी देण्यात आले होते. मात्र महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरही गेली कित्येक वर्षे या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा रस्ता वर्षानुवर्षे खचत गेला असून यंदाच्या पावसाळ्यात तर अनेक ठिकाणी तो पूर्णतः वाहून गेला आहे.
उताराच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील माती वाहून गेल्याने सध्या फक्त दगडधोंडेच शिल्लक राहिले आहेत. येथून वाहन चालवणे तर दूरच, साधे चालणेही जीवघेणे बनले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुतारवाडीतील नागरिकांनी दोन वेळा उपोषण करून आंदोलन केले होते. तसेच सावंतवाडी व ओरोस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात लेखी निवेदनेही सादर करण्यात आली होती. मात्र केवळ आश्वासने देण्यात आली, प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो किंवा एखादा निष्पाप बळी जाऊ शकतो. प्रशासन त्याचीच वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने विलंब न करता या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा होणाऱ्या संभाव्य अपघातांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा स्पष्ट इशाराही सुतारवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

