कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी येथे रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर उत्साहात संपन्न.

*🛑सावंतवाडी येथे रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर उत्साहात संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग व घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे काल (दि. २५ जानेवारी २०२६) १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मन, शरीर आणि आत्मा यांचा संगम म्हणजे योग हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात नियोजित वेळेत पाच मिनिटांत सर्वाधिक सूर्यनमस्कार पूर्ण करण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये

प्रथम – गौरी धैर्यशील शिर्के (५ मिनिटांत ४० सूर्यनमस्कार),

द्वितीय – दुर्गा साईश वाडकर (३९),

तृतीय – निशिगंधा नारायण सावंत (३४) व विशाल विजय लातये (३४),

तर उत्तेजनार्थ – महादेव बाळकृष्ण तेली (३३) यांनी यश संपादन केले.

या सर्व विजेत्यांना घे भरारी फाउंडेशनच्या वतीने प्रशस्तीपत्र, सुवर्ण–रौप्य–कांस्य पदके, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय जास्तीत जास्त सूर्यनमस्कार पूर्ण केल्याबद्दल सारिका पुनाळेकर, सीमा रेडीज आणि सलोनी वंजारी यांचाही प्रशस्तीपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला. विशेष आकर्षण ठरले ते ७२ वर्षांच्या जयश्री गणपत घडशी आणि ६७ वर्षांच्या मृणाल महादेव सावंत यांनी तब्बल १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करून उपस्थितांची दाद मिळवली; त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांनी सूर्यनमस्काराचे शास्त्रीय व आरोग्यदायी महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.पी.डी. स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. संप्रवी कशाळीकर, तर उद्घाटक म्हणून राष्ट्र सेवा पुरस्कारप्राप्त योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर उपस्थित होते.

यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी, सल्लागार शारदा गुरव, तसेच मेघा भोगटे, गीता लोहार, सीमा रेडीज, सारिका पुनाळेकर, वर्षा गावकर, रविंद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने उद्घाटनानंतर १०८ सूर्यनमस्कारांचे शिबीर श्री. शेखर बांदेकर यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ, तर आभारप्रदर्शन श्री. विशाल लातये यांनी केले. या शिबिरात फिटनेस योग अकॅडमीचे विद्यार्थी, हिरकणी, महालक्ष्मी व वटसावित्री योगवर्गातील साधक तसेच सावंतवाडी शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला. एकूण ९० योगसाधक या उपक्रमात सहभागी झाले.

आर.पी.डी. हायस्कूल व्यवस्थापनाने स्टेज, साउंड सिस्टीम व जागा मोफत उपलब्ध करून दिली. आगामी काळात सावंतवाडीत अशा प्रकारचे अधिक योगशिबिरे व वर्ग आयोजित करण्यात येतील, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!