🛑भाजप नसानसात,पण अपक्ष रणांगणात!”
*🛑भाजप नसानसात,पण अपक्ष रणांगणात!”*
*🛑आरोंद्यात …अमेय विजय आरोंदेकर यांचे बंड; थेट लढत जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २२:-* विधानसभा निवडणुकीत शिवसेना–भाजप युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना मताधिक्य मिळवून देत आरोंदा गावात राजकीय चमत्कार घडवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अमेय विजय आरोंदेकर यांनी अखेर काल आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
“निवडून येण्यासाठीच मी रणांगणात उतरलो आहे,” असे ठाम शब्दांत आरोंदेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी जरी अपक्ष उमेदवार म्हणून उभा असलो, तरी भारतीय जनता पक्ष माझ्या नसानसात भिनलेला आहे,असे सांगत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. माझे वडील जिल्हा परिषद सदस्य, आई जिल्हा परिषद सदस्य तर बहीण पंचायत समिती सदस्य असल्याने मला राजकीय वारसा लाभलेला आहे. तसेच आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात गेल्या १० वर्षात ज्या इतर प्रमाणात विकास होणे गरजेचे होते त्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत नाही.याची खंत त्यांना कायमच मनात आहे, त्यामुळे आता पुढे येऊन काहीतरी बदल व्हावा आणि दिखाऊ नेतृत्वापासून या मतदारसंघाला सुटकारा मिळावा जेणेकरून आरोंदा मतदार संघात विकासाची खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण उमेदवारी भरली. त्यातच आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपकडे असून तो सोडून देण्यात आला, याचे मला तीव्र दुःख आहे, असे त्यांनी सांगितले.
इतर मतदारसंघांसाठी जसा हट्ट धरला गेला, तसा हट्ट आरोंदा मतदारसंघासाठी धरला गेला असता तर हा मतदारसंघ भाजपलाच मिळाला असता. मात्र तो शिवसेनेला गेल्याने माझी भाजप पक्षाकडून मिळणारी संधी हुकली. त्यामुळे नाईलाजाने मला अपक्ष उमेदवारी भरून निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागल्याचे आरोंदेकर यांनी स्पष्ट केले.
सुमारे साडेतीन हजार मतदारसंख्या असलेल्या आरोंदा गावाचा मी मूळ रहिवासी असून, या मतदारसंघावर माझा नैसर्गिक हक्क होता. मात्र तो विचारात न घेतल्यानेच मी अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत दिलीप नाईक, चिंतामणी नाईक, अक्षय नाईक, शुभम नाईक, सीताराम उर्फ काका नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आपल्याला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

