आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 केर-निडलवाडीची गावपळण : सामाजिक सलोख्याचे जिवंत उदाहरण

🛑 मराठा–धनगर समाज एकत्र; दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा, यंदा ४ दिवसांची गावपळण

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴दोडामार्ग, दि-२१:- कोकणच्या प्रथा, परंपरा म्हणजे एक प्रकारचा उत्सव व एकतेचा नारा असतो. मालवण तालुक्यातील आचरा म्हटले की, गावपण प्रथा जोपासणारा गाव असे नाव समोर येते हे खरे असले तरी दोडामार्ग तालुक्यातील राज्यस्तरीय आदर्श गाव पुरस्कार प्राप्त केर गावची नीडलवाडी ही सुमारे 150 हुन वर्षापासून ही प्रथा जोपासत आहे. इथे मराठा व धनगर समाजाची कुटुंबे राहतात. दोन्ही समाज घटक सलोख्याने राहत वाडीवस्तीवरील सण उत्सव मोठ्या भक्ती भावाने एकत्रित साजरे करतात. अशाच प्रथा परंपरांमध्ये गावपळण ही प्रथा जोपासताना या वाडीचा सामाजिक सलोखा पुन्हा अधोरेखित होतो. ऐकण्यात व सांगण्यात यापूर्वी पाटये गावात अशी प्रथा होती मात्र अलीकडच्या काही वर्षात ती बंद असल्याचे समजते त्यामुळे ही गावपळण प्रथा बहुदा तालुक्यातील एकमेव असावी.
दोडामार्ग तालुक्यापासून अगदी शेवटच्या टोकावर केर गाव वसला आहे डोंगर कपारीत निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या शांत गाव म्हणून या गावाची विशेष ओळख आहे या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली ग्रामपंचायत आहे. केर व भेकुर्ली हे महसुली गाव आहेत यापैकी केर गावच्या भौगोलिक क्षेत्रात गावठाण, अवाट, नीडल अशा वाड्या येतात. केर गावाने जवळपास १५ हून अधिक विविध पुरस्कार पटकाविले आहेत शिवाय राज्यस्तरीय आदर्श गाव हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार या गावात प्राप्त झाला आहे. नीडलवाडी ही मुख्य गावापासून डोंगराच्या दिशेने वसली आहे इथे धनगर व मराठा समाज अशी कुटुंबे राहतात.
गावपळण करण्यामागील आख्यायिका जाणकार ग्रामस्थ यांना विचारली असता ते सांगतात की, नीडलवाडी अधिष्ठान महापुरुष देवतेच्या अधिपत्याखाली आहे पूर्वापार या ठिकाणी वस्ती होत नव्हती कालांतराने देवाला कौल प्रसाद लावून वस्ती करण्याची विनंती करण्यात आली शिवाय या ठिकाणी वस्ती नसल्याने त्या ठिकाणचे शेतीसाठी असणारी घरे ही गवती कौलांचे (गवतापासून) बनविले जात होते. त्या ठिकाणी भात व इतर शेती असल्याने त्यानंतर खापरी नळ्यांसाठी प्रसाद झाले. वाडीत वस्तीला परवानगी नव्हती मात्र देवाच्या प्रसादाने तशी प्रथा जोपासण्यासाठी वर्षातून एक दिवस वस्ती निर्मनुष्य करण्याचे वचन देण्यात आले. वर्षाने एकदा अशी असणारी प्रथा पुढे तीन वर्षांनी तीन दिवस अशी झाली जी आतापर्यंत अबाधित आहे.

यावर्षी ४ दिवसांची गावपळण – विष्णू देसाई

येथील जेष्ठ ग्रामस्थ विष्णू उर्फ बाळू देसाई म्हणाले, तीन वर्षांनी एकदा वस्ती निर्मनुष्य करण्याचा निर्णय सुरुवातीला कौल प्रसाद लावून व्हायचा मात्र आताच्या घडीला वस्तीतील दोन्ही समाजातील जाणकार एकत्र बसतात व बैठकीत निर्णय घेतात त्यानंतर गाव पळणीला सुरुवात होते त्यानंतर वस्तीवरील सर्वजण खालील अवाटवाडी किंवा गावठाण वाडी येथे राहतात. तीन वर्षांतुन तीन दिवस गावपळण होते मात्र एका वर्षी काही कारणास्तव दोन दिवस झाली तो दिवस यावर्षी वाढला असून बुधवारपासून चार दिवसांची गावपळण सुरु झाली आहे.

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!