कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीला ‘आदर्श मॉडेल शहर’ बनवण्याचा निर्धार – नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा विकास रोडमॅप सादर.

*🛑सावंतवाडीला ‘आदर्श मॉडेल शहर’ बनवण्याचा निर्धार – नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा विकास रोडमॅप सादर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर ‘रोडमॅप’ सादर केला. सावंतवाडी हे माझे कुटुंब असून शहराला राज्यातील एक ‘आदर्श मॉडेल शहर’ बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याची जिद्द आम्ही ठेवली असून विकासात्मक कामे पूर्णत्वास नेण्यासाठी माझा पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बाळंतपणाच्या पार्श्वभूमीवर काही काळ प्रत्यक्ष उपस्थिती शक्य नसली, तरी ऑनलाईन पद्धतीने सहकारी नगरसेवक व प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना ‘स्वच्छता’ हे पहिले पाऊल असल्याचे सांगत त्यांनी ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जाईल, असे नमूद केले. वेंगुर्ले शहराच्या धर्तीवर नव्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार असून बस स्थानक, नरेंद्र उद्यान तसेच शहरातील सर्व लहान-मोठ्या उद्यानांची स्वच्छता करण्यासाठी वॉर्डनिहाय विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

पाणीपुरवठ्याबाबत मुख्याधिकारी व ठेकेदारांशी सविस्तर चर्चा करून ठोस आराखडा तयार करण्यात आला असून येत्या एका वर्षात सावंतवाडीकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे ध्येय त्यांनी जाहीर केले. शहरातील गॅस पाईपलाईनचे कामही पूर्णत्वास नेण्यात येणार असून या कालावधीत होणारा तात्पुरता त्रास नागरिकांनी सहन करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कचरा डेपोची समस्या सोडवण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण व रिसायकलिंगवर भर देण्यात येणार आहे. शहराच्या सीमेवर टाकला जाणारा कचरा ही गंभीर समस्या असून त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील. शहरातील पार्किंगची व्यवस्था सुधारण्यासाठी ‘पे अँड पार्क’ व ‘नो पार्किंग झोन’ निश्चित करून कडक कारवाई केली जाणार आहे.

आरोग्य सुविधांबाबत उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी तसेच महिला रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरातील सुमारे १२०० भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ‘मिशन रेबिज’च्या माध्यमातून दीड वर्षांत निकाली काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सावंतवाडीच्या वैभवात भर घालणारे मँगो टू हॉटेल (पर्यटन सुविधा केंद्र), रघुनाथ मार्केट व हेल्थ पार्क यांसारखे बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले जाणार असून नवीन ‘फूड पार्क’ उभारण्याचाही मानस त्यांनी जाहीर केला.

विकासाच्या कामात कोणतेही राजकारण आणले जाणार नसून सर्व नगरसेवक व नागरिकांना विश्वासात घेऊनच शहराचा कायापालट केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान,बाळंतपणासाठी काही दिवस रजेवर जाण्याबाबत भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “आई होण्याचा क्षण प्रत्येक महिलेच्या जीवनातील सुवर्णक्षण असतो. गरोदर असतानाही मी निवडणूक लढवली, घरोघरी जाऊन नागरिकांना भेटले. या काळात स्वतःच्या आरोग्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले. नागरिकांनी भरभरून पाठिंबा देत मला विजयी केले. त्यामुळे निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी माझा ठाम भर राहणार आहे. प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी ऑनलाईन यंत्रणेद्वारे मी सातत्याने संपर्कात राहीन. सावंतवाडी हे माझे कुटुंब आहे आणि शहराच्या समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. या काळात सावंतवाडीकर आपल्या या मुलीला नक्कीच साथ देतील, असा विश्वास आहे.”

यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, सुकन्या नाईक, सुनिता पेडणेकर आदी नगरसेवक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!