🛑२६ जानेवारीला उपोषणाचा इशारा; मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ठरावाची मागणी.
*🛑२६ जानेवारीला उपोषणाचा इशारा; मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ठरावाची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेच्या कौन्सिल सभेत ठराव घ्यावा, या मागणीसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या वतीने नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची भेट घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याचे आश्वासन दिले.
कृती समितीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत कोल्हापूर सर्किट बेंच येथे जनहित याचिका दाखल आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीने ८ ऑक्टोबर २०२५ रोजी रुग्णालयाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. मात्र, या अहवालावर अद्याप शासनाकडून कोणतीही अंतिम कार्यवाही झालेली नाही.
या संदर्भात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांनी उपसंचालक आरोग्य यांच्याशी पत्रव्यवहार केला असता, अहवालातील शिफारशींबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे लेखी कळवण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी २०२६ रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार सादर करण्यात आलेल्या अहवालात नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नऊ पदे रिक्त, तसेच ट्रामा केअर युनिटमधील पाचही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रक्तपेढीसह अन्य रिक्त पदे तातडीने भरण्याची शिफारसही समितीने केली आहे. आय.सी.यु. व ट्रामा केअर युनिट अद्ययावत करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी सावंतवाडीकरांची तीव्र मागणी आहे.
याशिवाय, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेला ‘भूखंड क्र. ५ अ’ हा शासनाने याच कारणासाठी राखीव ठेवला असतानाही त्याची भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्षा यांनी जनतेच्या भावना पत्राद्वारे शासनाकडे कळवाव्यात आणि कौन्सिल सभेत ठराव मंजूर करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली.
“गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना हा प्रश्न गेली दहा वर्षे रखडलेला आहे. सावंतवाडीकरांच्या जीवन-मरणाच्या या प्रश्नासाठी ठोस पुढाकार घ्यावा,” असे आवाहन उपस्थितांनी केले.
यावेळी अभिनव फाउंडेशनचे राजू केळुसकर, जितेंद्र मोरजकर, किशोर चिटणीस, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, संतोष वैज, अध्यक्ष नरसू रेडकर, रविंद्र ओगले, संजय लाड, तुषार विचारे, प्रा. सुभाष गोवेकर, कृझ फर्नांडिस, मोहसीन मुल्ला, चंद्रकांत घाटे, संतोष तळवणेकर, दिगंबर पावसकर तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

