कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सर्वांना सोबत घेऊन सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर.

*🛑सर्वांना सोबत घेऊन सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* सर्वांना सोबत घेऊन सावंतवाडी : सर्वांना सोबत घेऊन सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारसावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विकासाच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम केले जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष जात-पात अथवा धर्म न पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही जबाबदारी देतो. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला दिलेल्या संधीचे सोनं करून पारदर्शक कारभार करेन, असेही त्यांनी सांगितले.

ॲड. निरवडेकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे ते आभारी आहेत. तसेच भाजपचे नेते विनोद राऊळ, माजी नगरसेवक विलास जाधव, नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक १० मधील मतदारांचे त्यांनी विशेष आभार मानले. भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही मोठी जबाबदारी दिली जाते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले असून उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल पक्षाचे त्यांनी आभार व्यक्त केले.

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने चालविला जाईल. नागरिकांच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. सर्व नियमांचे पालन करूनच कामकाज करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहरात सध्या सुरू असलेली पाईपलाईनची कामे नियमानुसार व योग्य पद्धतीने होतील यासाठी दक्षता घेतली जाईल. याबाबत ठेकेदारांना सक्त सूचना देण्यात आल्या असून नियमबाह्य कामे आढळल्यास ती तात्काळ थांबविण्यात येतील. ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत, तेथे काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. धुळीचा त्रास होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक कामांवर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. कचरा डेपोवर सध्या काही प्रमाणात कर्मचारी कमी असले तरी तेथे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी केलेल्या टीकेबाबत खंत व्यक्त करत, ते नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी पार्टी केल्याचे त्यांनी सांगितले होते, मात्र आता त्यांना पार्टी करता येत नसल्याचे वाईट वाटत असावे, असा टोला त्यांनी लगावला.

तसेच नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असून येत्या महिन्याभरात मुख्याधिकारी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!