🛑वेंगुर्ले नगर वाचनालयाचे पुरस्कार वितरण १८ रोजी.
*🛑वेंगुर्ले नगर वाचनालयाचे पुरस्कार वितरण १८ रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १४:-* वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेतर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार प्रदान कार्यक्रम व विविध स्पर्धांत क्रमांक पटकाविलेल्या गुणवंतांचा पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात रविवार, १८ जानेवारी, सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.सर्व पुरस्कारांचे वितरण बैं. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ल्याचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते होणार आहे.
वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेतर्फे दिले जाणारे श्रीकृष्ण सौदागर व स्मृती ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ – अभिमन्यू गणपत लोंढे, सावंतवाडी यांना, सौ. सुशीला श्रीकृष्ण सौदागर स्मृती ‘आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार’ डॉ. जी. ए. बुवा,सावंतवाडी यांना, टाककर शेट्ये ट्रस्ट, पुणे पुरस्कृत ‘साहित्यिक पुरस्कार’ कल्पना रावजी बांदेकर,सावंतवाडी यांना,स्व.विष्णूपंत गणेश नाईक आदर्श ग्रंथालय पुरस्कार’ श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा-मालवण या ग्रंथालयास,’स्व.श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार आनंद महादेव देवळी, कै. प्रा. उदय खानोलकर ग्रंथसंग्रहालय,मळगाव यांना, ‘स्व.लक्ष्मीकांत सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार’ सौ.स्नेहा धोंडू नारिगणेकर,शिरोडा यांना, ‘स्व.कृष्णा कृष्णा न्हानू आसोलकर स्मृती बालसाहित्यिक पुरस्कार’ महेश पांडुरंग काणेकर, कणकवली यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या ज. बा. आरोस्कर, म. शां. भांडारकर वक्तृत्व स्पर्धा,प्राथमिक शाळांसाठी घेण्यात आलेल्या श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा,अ. ना.शेणई पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा, बालवाडी स्पर्धा,भालचंद्र कर्पे स्मृती गायन स्पर्धा,पं. जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा आणि सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा,रामचंद्र किनळेकर व मंदाकिनी किनळेकर स्मृती पारितोषिक स्व.पद्माकर स. सौदागर स्मृती चित्रकला स्पर्धा, खर्डेकर महाविद्यालयातील पदवी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व सर्व स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पुरस्कार प्राप्त मान्यवर,विविध स्पर्धांत क्रमांक पटकाविलेले गुणवंत विद्यार्थी,पालक आदींनी उपस्थित राहवे,असे आवाहन नगर वाचनालय,वेंगुर्लेचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

