आणखीमहाराष्ट्रमुंबई

🛑 मुंबईत पालकमंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-११:- मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय सुवर्णगड निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तीने ठेवलेली संशयास्पद बॅग आढळून आल्याने आज मोठी खळबळ उडाली.

ही बाब लक्षात येताच पोलीस प्रशासनाने तात्काळ सतर्कता दाखवत परिसरात बॅरिकेट्स लावून संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. बॉम्ब शोधक पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बॅगेची कसून तपासणी सुरू आहे.

दरम्यान, मंत्री नितेश राणे यांचा आज मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगर येथे प्रचार दौरा नियोजित असल्याने या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता अत्यंत दक्षतेने कारवाई सुरू केली आहे.

सदर बॅग कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून, पोलीस यंत्रणा सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत आहे. घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसरावर कडेकोट नजर ठेवण्यात येत आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेचा नेमका उलगडा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!