बी.व्ही.जी. इंडिया प्रा. लि. पुणे व क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा. लि. मुंबईच्या महिला कर्मचाऱ्यांचे ९ महिने वेतन थकीत
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
🎴सावंतवाडी: सावंतवाडी : बी.व्ही.जी. इंडिया प्रा. लि. पुणे व क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा. लि. मुंबईच्या महिला कर्मचाऱ्यांचे ९ महिने वेतन थकीत ठेवल. या कंपनीविरोधात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सावंतवाडी समोर या महिलांनी कामबंद आंदोलन छेडले. गेले ८ दिवस हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहाबाहेर अशाच प्रकारच आंदोलन सुरू आहे. सावंतवाडी येथील आंदोलनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या महिलांची व्यथा त्यांनी जाणून घेतली. तर पगार थकित ठेवणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला याचा जाब विचारला. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच लक्ष वेधत या महिलांना न्याय मिळवून देणार असल्याचा मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दीपक जाधव, शहराध्यक्ष देवा टेंमकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, जावेद शेख, चित्रा बाबर-देसाई, सचिन पाटकर राजू धारपवार, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

