*◼️दोडामार्ग मधिल रस्त्यांचे प्रश्न अधांतरी;बांधकाम विभागा बाबब नागरिकांमधून नाराजी व्यक्त
🖥 Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:प्रतिक राणे
🎴दोडामार्ग:
दोडामार्ग मधून जाणाऱ्या कर्नाटक-गोवा या राज्या महामार्गची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यासाठी अनेक उपोषणे, आंदोलने होऊन सुद्धा या विषयावर बांधकाम विभाग पाठ फिरवत आहे.
दोडामार्ग विजघर रस्ता व्हावा यासाठी ९ फेब्रुवारी रोजी साटेली-भेडशी चर्च समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा उपअभियंता चव्हाण यांनी नरमाईची भुमिका घेत पंधरा दिवसात वरिष्ठां सोबत बैठक लावण्याचे लेखी आश्वासना नंतर आंदोलन कर्त्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले होते.परंतु बांधकाम विभागाने लेखी निवेदन देऊन पंधरा दिवस गेले.
मात्र हा रस्ता अजून दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिकांमधून बांधकाम विभागा बाबब नाराजी व्यक्त होत आहे.

